६ डिसेंबर २०१९ रोजी भारतात अशतोष गोवारीकर यांच्या प्रदर्शित होणाऱ्या “पानिपत” चित्रपटावरुन अफगाणिस्तानातील सोशल मीडिया युजर्समध्ये चांगलेच वातावरण तापले असून अहमदशाह अब्दालीच्या भूमिकेवरुन अफगाणिस्तानात दोन गट पडले आहेत.
एका गटाचे म्हणणे आहे की चित्रपटात अफगाणिस्तानच्या अहमदशाह अब्दालीला अपमानित करुन दाखवले आहे, तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे चित्रपट रिलीज झाल्याशिवाय प्रतिक्रिया देणे योग्य नाही. अफगाणिस्तानच्या इतिहासासोबत छेडछाड केली जात असल्याचा काही नेटिझन्सचा आरोप आहे.
काय आहे पानिपत चित्रपटाची कथा ?
मराठा साम्राज्य शिगेला पोहोचले असताना हिंदुस्थानात त्यांना आव्हान देणारे कोणीही नव्हते. पण नंतर मराठ्यांना संपवून भारतावर राज्य करण्याच्या महत्त्वाकांक्षेने अफगाण शासक अहमद शाह अब्दाली भारतात येतो. अब्दालीचा मुकाबला करण्यासाठी मराठ्यांचे सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवा दिल्लीकडे कूच करतात.
अब्दाली आणि मराठ्यांचे सैन्य पानीपतमध्ये एकमेकांना भिडते आणि अब्दालीचा विजय होतो. १७६१ मध्ये पानिपत मध्ये झालेल्या मराठा-अब्दाली युद्धावर आधारित “पानिपत” या चित्रपटातील ही कथा आहे. अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त, सदाशिवरावांच्या भूमिकेत अर्जुन राव आणि पार्वतीबाईंच्या भूमिकेत कृती सेनन आहे.
अफगाणिस्तानच्या दूतावासांनीही दिली प्रतिक्रिया
पानिपत चित्रपटावरुन अफगाणिस्तानात सुरु असणाऱ्या सोशल वॉरमध्ये अफगाणिस्तानचे भारतातील दूतावास नसीम शरीफजी यांनीही उडी घेतली त्यांनी ट्विटद्वारे अफगानिस्टनच्या नेटिझन्सना सांगितले आहे की, “संजय दत्तने त्यांना आश्वस्त केले आहे की, चित्रपटात अहमदशाह अब्दालीच्या व्यक्तिरेखेसोबत काहीही छेडछाड केली असती तर मी चित्रपटात कामच केले नसते.”
५ नोव्हेंबरला संजय दत्तने अब्दालीचा लूक ट्विटरवर शेअर केल्यांनतर अफगाणिस्तानचे माजी दूतावास शाइदा अब्दाली यांनी उत्तर देताना म्हटले आहे, “प्रिय संजय दत्त, ऐतिहासिकदृष्ट्या भारतीय चित्रपट भारत आणि अफगाण यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. मला आशा आहे की ‘पानिपत’ चित्रपटाने आपल्या संयुक्त इतिहासातला हा महत्त्वपूर्ण घटनाक्रम लक्षात ठेवला असेल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.