१) पाकिस्तान आपल्या कोणत्याच नागरिकाला इस्राईलला जाण्यासाठी व्हिसा देत नाही. यामुळे कोणताच पाकिस्तानी नागरिक तिथून सरळ इस्राईलला जाऊ शकत नाही. पाकिस्तान आणि इस्राईल या देशांमध्ये कोणतेही राजकीय संबंध नाहीत. पाकिस्तानच्या मते तर इस्राईल नावाचा देशच नाही. या कारणामुळे पाकिस्तान आपल्या नागरिकांना तिथे जाण्यासाठी व्हिसा देत नाही. २) पाकिस्तानामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणावर वर्षभरात २ लाखापेक्षा जास्त खर्च होत असेल, तर त्याला ५% कर भरायला लागतो.
३) पाकिस्तानच्या कायद्यानुसार तिथले नागरिक लग्नाच्या आधी कुठल्याही मुलीसोबत एकत्र राहू शकत नाहीत. कारण असे करणे तिथे बेकायदेशीर आहे. ४) पाकिस्तानमध्ये प्रधानमंत्री किंवा राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी व्यक्ती शिकलेला असणे गरजेचे नाही. परंतु एखाद्या शाळेत शिपायाची नोकरी हवी असेल तर मात्र व्यक्ती शिकलेली असणे गरजेचे असते.
५) पाकिस्तानामध्ये त्यांच्या प्रधानमंत्र्यांची मस्करी करताना कुणी पकडले गेल्यास त्याला मोठा दंड भरण्याची शिक्षा केली जाते. ६) पाकिस्तानमध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात घराबाहेरचे काहीही खाणे बेकायदेशीर मानले जाते. गैरमुस्लिम लोकांसाठी देखील हा कायदा लागू आहे.
७) पाकिस्तानमध्ये तृतीयपंथीची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून त्यांना सैन्यात भरती होता येत नाही. ८) पाकिस्तानमध्ये कोणाच्याही परवानगीशिवाय त्याच्या फोनला हात लावणे बेकायदेशीर मानले जाते. त्यासाठी एखाद्याला ६ महिने तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.
९) पाकिस्तानमध्ये कोणाला स्पॅम मेसेज पाठवणे बेकायदेशीर आहे, असे करताना आढळल्यास १० लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. १०) पाकिस्तानात काही अरबी शब्द जसे अल्लाह, मस्जिद, रसूल आणि नबी यांचे इंग्रजीमध्ये भाषांतर करणे बेकायदेशीर आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.