INX Media कंपनीत परकीय गुंतवणूकीला परमिशन देताना भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जमीन फेटाळल्यानंतर त्यांच्या डोक्यावर अटकेची तलवार लटकत आहे.
२० ऑगस्ट पासून CBI आणि ED चिदंबरम यांची चौकशी करत आहे. जवळच्या नातेवाईकांच्याही घराचा तपास त्यांनी घेतला आहे. दिल्लीतील NCR च्या डझनभराहुन अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. ED चा दावा आहे की त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर बेनामी संपत्ती आहे.
किती आहे पी.चिदंबरम यांची संपत्ती
पी.चिदंबरम यांच्या कुटुंबीयांनी घोषित केले आहे की ते १७५ कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. चार वर्षांपूर्वी राज्यसभा निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार चिदंबरम आणि त्यांच्या पत्नीकडे ९५.६६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्यांच्यावर ५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यांचा मुलगा कीर्ती चिदंबरम ८० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. केवळ भारतातच नाही, तर परदेशातही चिदंबरम परिवाराची संपत्ती आहे. त्यात बंगले, बँकांतील ठेवी इत्यादि गोष्टींचा समावेश आहे.
पहिल्यापासून श्रीमंत आहे चिदंबरम परिवार
पी.चिदंबरम यांचा जन्म तामिळनाडूच्या शिवगंगा येथील चेट्टीयार या एका श्रीमंत व्यावसायिक कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा चेट्टीनाड येथील एक गर्भश्रीमंत सावकार होते. त्य्यामुळे पी.चिदंबरम हे मुळातच एका श्रीमंत घराण्याशी संबंधित व्यक्ती आहेत. देशातील टॉपच्या वकिलांमध्ये त्यांची गणती होते. त्यांच्या एका सुनावणीची फी लाखांमध्ये असायची. २०१४-१५ मध्ये त्यांनी आपली वार्षिक कमाई ८.५ कोटी रुपये तर आपल्या पत्नीची वार्षिक कमाई १.२५ कोटी रुपये सांगितली होती.
पी. चिदंबरम यांच्याकडे ५ लाख रुपये रोख रक्कम आहे तर बँका आणि इतर संस्थांमध्ये २५ कोटी रुपये जमा आहेत. त्यांच्याकडे १३.४७ कोटी रुपयांचे शेअर्स, डिबेंचर्स आहेत, तसेच पोस्ट ऑफिस योजनेमध्ये ३५ लाख रुपये जमा आहेत.
त्यांची १० लाखांची विमा पॉलिसी असून २७ लाखांच्या गाड्या आणि ८५ लाखांचे दागिने आहेत. २० कोटी ही त्यांची सर्वात मोठी तर ३००० ही सर्वात लहान ठेव आहे. ब्रिटनच्या केम्ब्रिज येथे १.५ कोटींची संपत्ती असून ७ कोटींची शेतजमीन, ४५ लाखांची व्यावसायिक इमारत आणि ३२ कोटींच्या घराचाही समावेश आहे.
ED ने काय जप्त केले
ED ने चिदंबरम यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची ५४ कोटी रुपयांची संपत्ती ताब्यात घेतली आहे. ही संपत्ती भारत, ब्रिटन आणि स्पेन देशात आहे. त्यामध्ये तामिळनाडूच्या उटी आणि कोडाईकॅनॉल येथील बंगला, शेतजमीन;
दिल्लीच्या जोरबाग मधील त्यांच्या आईच्या नावावर असणारा १६ कोटींचा बंगला, ब्रिटन मधील ८.६७ कोटी रुपयांचे कॉटेज आणि घर; स्पेन देशातील बार्सिलोना येथील १४.५ कोटींचे टेनिस क्लब आणि बँकात जमा असणारे ९० लाख रुपये यांचा समावेश आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.