मजुराच्या मुलाने २५ हजारांत सुरु केली कंपनी आज आहे कोट्यधीश..

यशस्वी उद्योग सुरु करायला पैश्याची गरज नसते. गरज असते ती नाविन्यपूर्ण कल्पनेची आणि अथक परिश्रम तुम्हाला यशापासून जास्त लांब राहू देत नाही. आज आपण अशीच एक गोष्ट बघणार आहो. केरळच्या एका मजुराच्या मुलाने अथक परिश्रमाच्या जोरावर उंच शीखर गाठले आहे. पीसी मुस्तफा असे या होतकरु तरुण उद्योजकाचे नाव. मुस्तफा यांनी 25 हजार रुपयांत कंपनी सुरु केली. आज या कंपनीचा टर्नओव्हर 100 कोटींवर पोहोचला आहे. 42 वर्षीय मुस्तफा वयनाड येथील रहिवासी आहे.

मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरु, पुण्यासह दुबईत ‘रेडी टू कुक पॅकेज्ड फूड’ मुस्तफा यांनी यशस्वी बिझनेस करत आहेत.

बालपणीच सोडले शिक्षण…

वडील मोलमजुरी करत होते. मुस्तफाने आठवी इयत्तेत शिक्षण सोडले. मुस्तफा हुशार बुद्धीमत्तेचे होते. शिक्षक मॅथ्यू यांनी मुस्तफाला शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. नंतर मात्र मुस्तफाने प्रत्येक वर्गात टॉप केला. कोलकात्यातून इंजीनियरिंग केल्यानंतर मुस्तफाला अनेक मल्टी नॅशनल कंपन्यांमध्ये काम करण्‍याची संधी मिळाली.

मुस्त्फाचे आई वडील

नोकरीसोबतच आयआयएममधून MBA

सात वर्षे एमएनसीत नोकरी केल्यानंतर मुस्तफा भारतात परतले. आयआयएममध्ये अॅडमिशन मिळवणे सोपवणे नाही. एमबीए करण्‍याचा निर्धार पक्का होता. आयआयएम बंगळुरुत अॅडमिशन घेतले. मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना त्यांच्या डोक्यात बिझनेसची कल्पना सुचली. हीच कल्पना मुस्तफा यांना ग्लोबल बिझनेसमध्ये रुपांतरीत केले.

1000 कोटींच्या टर्नओव्हरचे टार्गेट

मुस्तफाने केवळ 25,000 रुपयांत सुरु केली ‘पॅकेज्ड इडली व डोसा के रेडी टू मेक’ निर्माता कंपनी आहे. सुरुवातीला स्वत: 20 स्टोअर्सवर दररोज 100 पॅकेट डिलिव्हरी करत होते मुस्तफा, सध्या कंपनीचा टर्नओव्हर 100 कोटींवर नेण्याचे लक्ष्य मुस्तफाने ठेवले आहे. त्याच्या कंपनीत एक हजाराहून जास्त लोक काम करतात.

खासरे तर्फे मुस्तफाला सलाम…

Source : http://www.theweekendleader.com/Success/2555/getting-batter-daily.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.