एका रुपयात इडली विकणार्‍या अम्माला शेफ विकास खन्नाकडून मिळाले हे सरप्राईज

तामिळनाडू मधील ८५ वर्षांच्या कमलाथल अम्मा मागच्या ३०-३५ वर्षांपासून केवळ १ रुपयात इडली विकून लोकांचे पोट भरण्याचे पुण्य करत आहेत. इतकेच नव्हे तर या लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी इडलीच्या किंमतीत वाढ केली नाही. आजही त्या दररोज पूर्ण जोशामध्ये लोकांना इडली खायला घालून त्यांचे पोट भरत आहेत. कुठलाही माणूस उपाशी राहू नये अशी इच्छा आहे, त्यामुळेच एवढ्या माफक किमतीत इड्लीविक्रीचा व्यवसाय त्यांनी आजही चालू ठेवला आहे.

ज्यावेळी भारतातील प्रसिद्ध शेफ असणारे विकास खन्ना यांना इंडिया टाईम्समधील एका बातमीनंतर कमलाथल अम्माच्या या उदात्त कार्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी ट्विटरवर ट्विट करुन अम्माबद्दल माहिती गोळा करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. विकास खन्ना यांनी ट्विटद्वारे लोकांना आवाहन केले की, “मला कमलाथल अम्माशी कोणी संपर्क करुन देईल का ? माझ्याकडे चेन्नईच्या जवळ एका ठिकाणी ३५० किलो तांदूळ ठेवला आहे. अम्माशी संपर्क करुन हा तांदूळ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझी मदत करा.”

विकास खन्ना यांच्या ट्विटनंतर अनेक लोक त्यांची मदत करण्यासाठी पुढे आले. त्यांनी विकास खन्नांचा ३५० किलो तांदूळ अम्माकडे पोहोचवला. त्यानंतर विकास खन्नांनी ट्विट करुन सांगितले की, “आज आम्ही अम्माला सरप्राईज दिले. हॅप्पी मदर्स डे.” विकास खन्नाने यापूर्वीच ७५ भारतीय शहरांमध्ये राशन वाटप केले आहे अम्माबद्दल बोलायचे झाले तर यापूर्वी आनंद महिंद्रांनी सुद्धा त्यांना गॅस व सिलिंडर दिले होते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.