ममता बॅनर्जींचा राजकीय पक्ष तृणमूल काँग्रेसमधून खासदार म्हणून निवडून आलेल्या मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ लोकसभा निवडणुकांच्या सुरुवातीपासूनच खूप चर्चेत होत्या. पण निवडणूकीत विजयी झाल्यानंतरही या दोघींबद्दलच्या चर्चा थांबायचं नाव घेत नाही आहेत.
यावर्षी दोन नवे सुंदर चेहरे संसदेत जाणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. पण दरम्यान या दोघींचा मागे एक टिक टॉक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होता. स्वतः चित्रपट निर्माता दिग्दर्शक गोपाल वर्मा यांनी हा डान्स व्हिडीओ शेअर केला होता.
हा व्हिडिओ शेअर करताना राम गोपाल वर्मानं, ‘Wow Wow Wow!!! बंगालच्या नव्या खासदार मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ. आपला देश खूपच प्रगतीशील आहे. अशा खासदारांचं स्वागत आहे ज्यांना पाहून डोळ्यांना चांगलं वाटतं.’ असे लिहले होते.
आता पश्चिम बंगाल मध्ये दुर्गा पूजा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जातो. हा सण तीन ऑक्टोंबर ते सात ऑक्टोबर मध्ये होणार आहे. यासाठी युट्युब वर खासदार मिमी आणि नुसरत जहा यांचा व्हिडीओ वायरल झाला आहे या व्हिडीओ मध्ये त्यांच्या सोबत बंगाली स्टार सुभाश्री गांगुली आहेत.
हा व्हिडीओ फेसबुकवर १५ लाखहून अधिक लोकांनी बघितला आहे. हे गाणे टॉलीवुड कंपोज़र इंद्रदीप दासगुप्ता यांनी कंपोज केले आहे. बाबा यादव द्वारा कोरियोग्राफ केलेला आहे. या नृत्यामध्ये बंगाली पारंपरिक छाउ नृत्य आहे.
हा डान्सचा एक पारंपारिक प्रकार आहे. नुसरत जहां बशीरहाट, पश्चिम बंगाल आणि मिमी जाधवपुर येथून खासदार आहे.
खाली आपण हा व्हिडीओ बघू शकता.
आपल्याला हि व्हिडीओ आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.