नुकतीच दक्षिण आफ्रिकेमध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करुन फायनलमध्ये बांगलादेशचे आव्हान पेलायला उतरलेल्या भारतीय संघाने चांगला खेळ केला, परंतु थोडक्यात विजय हुकला. तरीसुद्धा भारत हा १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ म्हणूनच गणला जातो, कारण भारताने आजपर्यंत चार वेळा हा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. परंतु भारताने चारही वेळा हा पराक्रम विदेशी धरतीवर केला आहे.
१९९८ पासुन सुरु झालेल्या या स्पर्धेत भारताचे रेकॉर्ड इतके चांगले असले तरीही एक प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो, तो म्हणजे आजपर्यंत भारतात या स्पर्धेचे आयोजन का करण्यात आले नाही ? अनेकदा असे सांगितले जाते की अशा स्पर्धेत फायदा होत नसल्याने BCCI या स्पर्धेचे भारतात आयोजन करत नाही. परंतु BCCI च्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी या गोष्टीचा इन्कार केला.
BCCI चे माजी खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी यावर उत्तर देताना सांगितले, “खरं तर हा प्रश्न ICC ला विचारला पाहिजे. अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेला ते कशा पद्धतीने आयोजित आणि प्रोत्साहित करु इच्छितात हे त्यांच्यावर अवलंबून आहे. भारतात अंडर-१९ वर्ल्ड कपचे आयोजन करण्याचा विषय BCCI च्या नाही, तर ICC च्या अखत्यारीतील आहे.”
BCCI चे माजी सचिव आणि निरंजन शाह सांगतात की, “आम्ही अंडर-१९ वर्ल्ड कप स्पर्धा आयोजनाच्या विरोधात नाही. अशा स्पर्धेतुन नफा होईल का नाही हा मुद्दाच नाही. फक्त विषय एवढाच आहे की भारतात ही स्पर्धा झाली नाही. ही स्पर्धा मलेशिया, दुबईसारख्या देशात खेळल्याने तिचे प्रमोशनही होते.”
आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये ३ वेळा अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी प्रत्येकी दोन वेळा ही स्पर्धा आयोजित केली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला आपल्याकडील खास माहिती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.