भारताच्या इतिहासात ५ ऑगस्ट २०१९ याच दिवशी जम्मू आणि काश्मीर राज्यासंदर्भात दोन मोठे निर्णय घेण्यात आले. पहिला निर्णय असा होता की जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० मधील काही उपकलमे त्वरित हटवण्यात आली आणि दुसरा निर्णय राज्याच्या पुनर्रचनेबाबत होता. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश असतील.
३१ ऑक्टोबर २०१९ पासून हा निर्णय अंमलात आला. जम्मू-काश्मीरसाठी गिरीशचंद्र मुर्मू आणि लडाखसाठी आर.के.माथूर यांची उपराज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख सोडून देशाच्या राजकारणात बर्याच गोष्टी बदलल्या आहेत आणि देशाचा नकाशादेखील बदलला आहे. जाणून घेऊया भारताच्या नवीन नकाशात काय काय बदल झाले…
जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर भारत सरकारने २ नोव्हेंबरला देशाचा नवीन नकाशा प्रसिद्ध केला आहे. नवीन नकाशामध्ये २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेश दर्शविण्यात आले आहेत.
सर्व्हे जनरल ऑफ इंडियाने हा नकाशा प्रसिद्ध केला आहे. विशेष बाब म्हणजे पाकिव्याप्त काश्मीर (पीओके)चे काही भाग नवीन नकाशामध्ये काश्मीरमध्ये दाखवले गेले आहेत. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या नवीन नकाशामध्ये मुझफ्फराबाद, पंच आणि मीरपूर या तीन पाकव्याप्त जिल्ह्यांसह २० जिल्ह्यांचा समावेश आहे. लडाखमध्ये कारगिल आणि लेह हे दोन जिल्हे आहेत.
५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीर राज्य दोन भागात विभागले केल्यामुळे भारताचा नकाशा बदलावा लागला. नवीन नकाशामध्ये दोन नवीन केंद्र शासित प्रदेश जोडले गेले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये २२ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये कारगिल आणि लेह ही दोन जिल्हे तयारकेले आहेत.
लेहच्या नकाशामध्येच गिलगिट-बाल्टिस्तानच्या पाकव्याप्त क्षेत्राचे दर्शन होते. याचा अर्थ असा आहे की लेह जिल्ह्यात गिलगिट, गिलगिट वझरात, चिल्हास, आदिवासी प्रदेश सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि चीनने पाकिस्तानला दिलेला अक्षय चिन यांचा समावेश आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.