प्रधानमंत्री मोदींच्या दैनंदिन वापरातील वस्तुंच्या किंमती तुम्हाला माहीत आहे का ?

भारताचे प्रधानमंत्री आणि नेहमी जगात चर्चेत राहणारे नाव नरेंद्र मोदि यांच्या स्टाईल विषयी अनेक लोक त्यांची वाहवा करतात. परंतु कधी विचार केला का नरेंद्र मोदी यांना कुठली कंपनी किंवा ब्रॅन्ड आवडते आणि त्याची किंमत किती असेल ? तर चला बघूया खासरे वर नरेंद्र मोदि यांच्या आवडत्या ब्रॅन्ड विषयी…

सर्वप्रथम बघूया प्रधानमंत्री मोदि यांना आवडणारी पेन…

नरेंद्र मोदी यांचे आत्मचरित्र नीलांजन मुखोपाध्याय यांनी लिहिलेली आहे त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे कि, नरेंद्र मोदि यांच्या कमजोरी पैकी एक आहे पेन स्पेशल डिझायनर पेन आणि डिझायनर घड्याळी… प्रधानमंत्री मोडी MonteBlank कंपनीची पेन वापरतात. हि त्यांची आवडती ब्रॅन्ड आहे. त्याची किंमत २ लक्ष रुपया पर्यंत आहे. या कंपनीची सुरवात १९०६ साली जर्मनी मध्ये झालेली आहे. डिझायनर पेन,घड्याळी बनविण्याकरिता हि कंपनी प्रसिद्ध आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वापरत असलेली घडी..

पेन शिवाय मोदींना घड्याळीचेही प्रचंड वेड आहे. त्यांच्या आवडत्या ब्रॅन्ड आहेत Movado त्या सोबतच ते इतर कंपनी जसे Ebel, Concord, ESQ by Movado, Coach, Hugo Boss, Lacoste, Juicy Couture and Tommy Hilfiger या घड्याळी वापरतात. Movado कंपनी हि त्यांना आवडते ह्या घडीची किंमत २.५ लाख रूपया पर्यंत आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदि वापरत असलेले सनग्लासेस

प्रधानमंत्र्याच्या व्यक्तिमत्वास उठून दिसतात ते वापरत असलेले सनग्लासेस त्यांना आवडणारी चष्म्याची ब्रॅन्ड Bvlgari हि आहे. ह्या सनग्लासेसची किंमत लाख रुपया पर्यंत आहे. प्रधानमंत्री अनेक वेळेस वेगवेगळे सनग्लासेस वापरत असताना आपल्याला दिसेल ती कंपनी आहे Bvlgari…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदि वापरत असलेली टोपी

मोदींना अनेक वेळेस वेगवेगळ्या टोपी घालून आपण बघितले असेल. परंतु ह्या टोपी सुध्दा एकाच ब्रॅन्डच्या आहे ती ब्रॅन्ड Texan आहे. ह्या कंपनीच्या टोपी नरेंद्र मोदी यांना घालायला आवडतात. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांना ह्या टोप्यांची आवड आहे. वेस्टर्न आउटफिट घातल्यावर मोदींना अश्या टोपी घालायला आवडतात. साधारणतः ह्या सध्या टोपीची किंमत १५ हजार रुपया पर्यंत आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदि वापरत असलेले कपडे

प्रधानमंत्री मोदि ह्यांचा पेहराव नेहमी आकर्षक असतो कधी कुर्ता तर कधी कोट मागे त्यांनी घातलेला नरेंद्र मोदि नाव लिहलेला कोट हा १० लाख रुपयाचा होता. अहमदाबाद येथील बिपीन आणि जितेंद्र चौहान मोदी यांच्या करिता कुर्ता डिझाईन करतात.१९८९ पासून नरेंद्र मोदि Jade Blue ह्या चौहान बंधूच्या कंपनीकडून ड्रेस डिझाईन करून घेतात. मागे नरेंद्र मोदि लिहलेला कोट सुध्दा इथेच डिझाईन करण्यात आला होता. त्यांना राजेश खन्ना प्रमाणे गळ्यापर्यंत कुर्त्याची बटन लावयला आवडतात. त्यांच्या कोटचा मागे लिलाव झाल्यावर जगातील सर्वात महाग सूट म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. लिलावात किंमत लावण्यात आली होती 4,31,31,311 रुपये…

ह्या सर्वासोबत मोदि यांना वेगवेगळे हातानी बनवलेले दुपट्टे आणि शाल वापरण्याची सुध्दा सवय आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्या प्रधानमंत्र्यास शोभा देतात. लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.