नाना पाटेकर यांच्या आईवर मुंबईत अंत्यसंस्कार! पण हे वाचून तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल..

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना मातृशोक झाला आहे. नानांची आई निर्मला गजानन पाटेकर यांचे आज मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 99 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

वाढत्या वयामुळे त्यांना स्मृति भ्रंश झाला होता. पण त्या पुढील व्यक्तीच्या हालचालीवरून कोण आहे ते ओळखायच्या. त्यांच्यावर साश्रुनयनांनी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पाटेकर कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

नाना पाटेकर यांचे वडील टेक्स्टटाईल प्रिंटिंगचा बिझनेस करायचे. त्यामुळे ते मुंबईत राहायचे. तर नाना पाटेकर हे मुराडला आईसोबत राहायचे. नानांना सात बहीण भाऊ होते. पण ५ जणांचे लहानपणीच निधन झालेले. त्यानंतर त्यांच्या आईने नानांचे आणि त्यांच्या मोठ्या भावाचे पालनपोषण केले.

नानांना घडवण्यात त्यांच्या आईचा सिंहाचा वाटा होता. नानांचे वडील गजानन पाटेकर यांचे नाना २८ वर्षाचे असतानाच निधन झाले होते. आज आईचे निधन झाले त्यावेळी नाना घरात नव्हते. त्यांना माहिती झाल्यानंतर ते घरी पोहचले.

नाना यांना एक मुलगा आहे, ज्याचे नाव मल्हार आहे. नाना यांना अजून एक मुलगा होता, ज्याचे लहानपणीच निधन झाले. त्यांच्या मुलाला जन्मापासूनच अनेक आजार होते. नाना यांनी वयाच्या २७ व्या वर्षी लग्न केले होते. नानाच्या लग्नानंतर १ वर्षात त्यांचे वडील वारले तर अडीच वर्षानंतर मुलगा वारला. त्यामुळे नानांवर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. पुढे त्यांना दुसरा मुलगा झाला ज्याच्यामुळे नानांच्या आयुष्यात आनंद परतला.

नानाच्या आईच्या अंत्यसंस्काराला नाही आले बॉलीवूडचे कलाकार-

नानांच्या आईवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी नाना आणि त्यांचा मुलगा मल्हार होता. पण यावेळी या दोन सेलेब्रिटींसह इतर बॉलीवूडचे कोणीही स्टार उपस्थित नव्हते. सहसा सर्वत्र दिसणारे बॉलीवूडचे कलाकार यावेळी का उपस्थित नव्हते हा प्रश्न उपस्थित होत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Comments 2

  1. Manda loke says:

    भावपूर्ण श्रद्धांजलि ?

  2. निखिल गादेवार says:

    भावपुर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.