पुण्यात गेले तर ह्या २३ गणपती मंडळास अवश्य भेट द्या… भाग-१

पुण्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाची आगमन आणि विसर्जन केले जाते. अशा या गणेशोत्सव मंडळाकडून गणेशोत्सवा बरोबर अनेक विधायक वा सार्वजनिक कामे केली जातात. अशा या वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सव पाहण्यासाठी पुणेकारांबरोबर मुंबईकरहि गर्दी करतात. चला मग ओळख करून घेऊयात या गणेशोत्सव मंडळाची.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

जगभरात प्रसिद्ध असणारा बाप्पा. दगडूशेठ यांनी या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती. मंडळातील गणपती बाप्पाचे रूप पाहण्यासाठी लाखी भक्तांची झुंबड उडते. त्याचबरोबर दरवर्षी तयार केले जाणा-या मंदिराची प्रतिकृती. यावर्षी १२५ फुट उंच चामुंडेश्वरी देवीचे मंदिर उभारण्यात आले आहे. मंडळात दरवर्षी “महिला अथर्वशीर्ष पठणाचा” कार्यक्रम पाहण्याजोगा असतो. तसेच मंडळातर्फे अनाथ मुलांसाठी वसतीगृह, गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अशी अनेक सामाजिक कामे मंडळाने केली आहेत.
Ganpati Bhavan, 250, Budhvar Peth, Shivaji Road, Pune, Maharashtra 411002

कसबा गणपती मंडळ

मंडळाचे यंदाचे १२१ वर्ष. पुण्याचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध पुण्यातील मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपती मंडळाने यावर्षी पेशवेकालीन गणेशमहाल साकारला आहे. सिंहासनावर विराजमान श्रींची मूर्ती, सोळा खांब, भव्य सभामंडप या वैशिष्ट्यपूर्ण देखाव्यात विराजमान झाली आहे. गणपती बापाचे विसर्जन आणि मिरवणूक पालखीतून पारंपारिक पद्धतीने केली जाते.
158 Kasba Peth, Pune, Maharashtra 411011

तांबडी जोगेश्वरी मंडळ

मानाचा दुसरा गणपती व पुण्याची ग्रामदेवता असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळ स्थापन झालेले हे मंडळ. मंडळातील बाप्पा या वर्षी हि घांदीच्या मखरात विराजमान झाला आहे. मंडळात महिला भजन यांसारखे अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. गणपती बाप्पाची मिरवणूक हि पाहण्याजोगी असते.
Appa Balwant Chowk, Pune

गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

मानाचा तिसरा गणपती आणि पुण्याचा राजा म्हणून ओळखले जाणारे मंडळ. १२० वर्षात पदार्पण केलेल्या बाप्पाचे आगमन सुंदर मोराच्या प्रतिकृतीवरून करण्यात आले. मंडळातील बाप्पाची बाल गणेशाची मूर्ती उंदीरावर विराजमान असते.
Laxmi Road, Pune

तुळशीबाग गणपती मंडळ

पुण्यातील चौथा मानाचा गणपती. मंडळातील भव्य फायबर पासून बनवलेली मूर्ती. चांदीच्या दागिन्यांनी मढवलेली मूर्ती पाहण्यास मंडळात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गणपती बाप्पा एका काल्पनिक महालमध्ये मध्ये विराजमान झाला असून महालात देवगड येथील दशावतार शिल्प आणि गजेंद्रमोक्षाचे शिल्प तयार करण्यात आले आहे. कलादिग्दर्शक विवेक खटावकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले देखावे पाहण्यास अनेक भाविकांची गर्दी असते. गेल्यावर्षी बाप्पा मयूर महालात विराजमान झाला होता.
Tulshibaug, Pune

केसरीवाडा गणेशोत्सव मंडळ

पुण्यातील पाचवा मानाचा गणपती म्हणजे केसरीवाडा गणेशोत्सव. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवापैकी एक. केसरी वाड्यातील पटांगणात बाप्पा बसवला जातो. पूर्वी लोकमान्य टिळकांचे भाषण आणि व्याख्यान येथे होत असे आणि ती परंपरा मंडळाने अजूनही जपली आहे. आजही अनेक दिग्गजांचे कार्यक्रम आणि वैचारिक कार्यक्रम येथे केले जातात.
Narayan Peth, Pune

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळ

गणपती उस्तावाचे जनक असल्याचा दावा ह्या मंडळा तर्फे करण्यात येतो. अत्यंत साधेपणाने, कोणतीही आरास-देखावा न करता साजरा होणारा ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवांच्या प्रसारात पुढाकार घेण्याआधी, 1892 सालीच स्थापन झालेला गणपती. या गणपतीच्या स्थापनेपासूनच उत्सवासाठी वर्गणी गोळा न करण्याची प्रथा आहे. ती आजतागायत कायम ठेवल्याचे मंडळाचे विश्वस्त संजीव जावळे यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीत मंडळांना पास देण्याची पद्धत याच मंडळाने सुरू केली असून गुलालाचा वापर न करण्यावरही हे मंडळ पूवीर्पासून ठाम आहे. १25 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या मंडळातफेर् आरोग्य शिबीर, धर्मार्थ दवाखाना असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.

अखिल मंडई मंडळ

पुण्यातील महात्मा फुले मंडई आणि रे मार्केटच्या परिसरात साजरा होणा-या गणेशोत्सवाला एक ऐतिहासिक महत्व आहे. दरवर्षीप्रमाणे गजानन शारदेची मूर्ती पर्यावरणपूरक आहे. गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची असून इच्छापूर्ती गणपती म्हणून ओळखली जाते. यावर्षी मंडळातील बाप्पा कलादिग्दर्शक विनोद ऐलारपुरकर साकारलेल्या हेमाडपंथी लेण्यामध्ये विराजमान आहे. महालातील मत्स्य कन्याची शिल्पे पाहण्याजोगी आहे. मंडळातर्फे झुणका-भाकर केंद्र चालवले जाते. गोरगरीबांना स्वस्त दरात झुणका-भाकर येथे उपलब्ध असते.
Budhbar Peth, Mandai, Shukrawar Peth, Pune, Maharashtra 411002

हुतात्मा बाबू गेनू मंडळ

पुण्यातील मानाचा व नवसाचा गणपती होय. मंडळातील पगडी घातलेली बाप्पाची मूर्ती पाहण्यासारखी असते. यावर्षी मंडळात प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी तयार केलेल्या काश्मीर मधील शिकारी आणि हाउस बोटचा सेट उभारला आहे. अशा या भव्य देखावा नव्वद फुट लांब, चाळीस फुट रुंद आणि २५ फुट उंच आहे. या देखाव्याच्या मध्यभागी बाप्पा विराजमान आहेत. हाउस बोटीसमोर ३० बाय ४० लांबीचे तळे उभारून यात काश्मीरचे प्रतिक असलेले चार शिकारी तयार करण्यात आले आहे. गेल्यावर्षी मंडळात अजिंठा लेणी उभारण्यात आली होती अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळसाहेब मारणे यांनी दिली.
Babugenu chowk 411 002 Pune, Maharashtra

छत्रपती राजाराम मंडळ

पुण्यातील सर्वात जुने गणेशोत्सव मंडळ म्हणजे छत्रपती राजाराम मंडळ. १२२ व्या वर्षात पदार्पण केलेल्या मंडळातील गणेशाची मूर्ती पाहण्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. १८८५ सालापासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी तयार केलेल्या मूर्तीच्या बाप्पाचे दर्शन घेता येईल. मंडळातील बाप्पाची मूर्ती पुण्यातील अनेक जुन्या गणपती मुर्तींपैकी एक आहे. कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मूर्ती असून बाप्पा राक्षसाचा वध करतानाची आहे. यावर्षी बाप्पा कलादिग्दर्शक संदीप सुई यांनी साकारलेल्या काल्पनिक राजस्थानी महालात विराजमान झाली आहे. गेल्यावर्षी मंडळात अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती साकारली होती. मंडळातील कार्यकर्ते आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अनाथ आश्रमास मदत करतात, तसेच “अनाथ हिंदू महिलाश्रम” येथे महिलांसाठी कार्यक्रम, रक्तदान शिबीर असे अनेक सामाजिक कामे केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांनी दिली.
871, Sadashiv Peth Rd, Perugate, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030

खजिना विहीर तरुण मंडळ

१९३१ साली स्थापन झालेल्या मंडळाने ८३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. पौराणिक देखावे सादर करणा-या या मंडळाने या वर्षी “सीताहरण”चा देखावा तयार केला आहे. देखाव्यात २२ फुटी उंच रावण सीतेला घेऊन जाताना आणि जटायूची लढाई करतानाचे हलते दृश्य दाखवण्यात आले आहे. उल्हासनगरचे कलादिग्दर्शक बगादे यांनी हा देखावा साकारला आहे. गेल्यावर्षी “कुंभकर्णाची झोपमोड” या विषयावर हलता देखावा सादर करण्यात आला होता अशी माहिती मंडळाचे ओम कासार यांनी सांगितले.
1433, Sadashiv Peth, Khajina Vihir Chowk 411030 Pune, Maharashtra

उर्वरित गणपति येथे बघा- पुण्यात गेले तर ह्या २३ गणपती मंडळास अवश्य भेट द्या… भाग-२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.