नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतुकीचे नियम मोडणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडत आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना चांगलाच आर्थिक भुर्दंड भरावा लागत आहे. नव्या कायद्यानुसार वाहतूक पोलिसही तत्परतेने नियमांची अंमलबजावणी करत आहेत.
वाहतुकीच्या नियमांचे आपण पालन करणे महत्वाचे आहे परंतु नियमांचा हवाला देऊन वाहतूक पोलिस आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत. जसे आपण नियमांनी बांधलेली असतो, तसेच ट्राफिक पोलिसांनादेखील काही नियम पाळावे लागतात.
वाहतूक पोलिसांनाही हे नियम पाळावे लागतात
प्रत्येक ट्राफिक पोलीस गणवेशात असणे आवश्यक आहे. गणवेशावर बक्कल नंबर आणि त्याचे नाव असायला हवे. जर ट्राफिक पोलिसाकडे या गोष्टी नसतील तर तुम्ही त्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवण्यास सांगू शकता.
जर ट्राफिक पोलिसांनी आपले ओळखपत्र दाखवण्यास नकार दिला, तर आपण त्याला आपल्या गाडीची कागदपत्रे द्यायला नकार देऊ शकता. ज्या ट्राफिक पोलिसांनी आपली गाडी थांबविली आहे, त्यांच्याकडे दंडाचे पावतीपुस्तक किंवा ई-चलन असावे लागते. याशिवाय ते दंड वसूल करू शकत नाहीत.
ट्राफिक पोलिसांनी गाडी थांबविल्यास हे करा
जेव्हा जेव्हा एखादा ट्राफिक पोलिस आपली गाडी थांबवतो तेव्हा आपण आरामात गाडी बाजूला लावावी. गाडीची चावी काढून आपल्याजवळ ठेवावी. पोलिसाला आपल्या गाडीची कागदपत्रे दाखवावीत.
लक्षात ठेवा की तुम्हाला गाडीची कागदपत्रे फक्त दाखवायची आहेत, ट्राफिक पोलिसांच्या स्वाधीन करायची नाहीत. यादरम्यान तुम्हाला ट्राफिक पोलिसांना सहकार्य करावे लागेल, सोबतच ट्राफिक पोलिसांनाही तुमच्याशी सौजन्याने वागणे आवश्यक आहे. कुठल्याही परिस्थितीत ट्राफिक पोलिसासोबत हुज्जत घालू नका.
ट्राफिक पोलीस तुमच्यासोबत हे करू शकत नाही
ट्राफिक पोलिस जबरदस्तीने आपल्या गाडीच्या चाव्या बाहेर काढू शकत नाहीत. तो तुमच्याशी कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन करू शकत नाही. जर तुमची गाडी रस्त्याच्या कडेला उभी असेल, तर जोपर्यंत आपण गाडीत आहोत तोपर्यंत क्रेन आपली गाडी उचलू शकत नाही.
आपली गाडी चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या ठिकाणी पार्क केली असेल तरच तुमची गाडी उचलून नेता येते. वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल ट्राफिक पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले तर २४ तासांच्या आत दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणे आवश्यक असते.
जर ट्राफिक पोलिसांनी गैरवर्तन केले तर आपण हे करू शकता
जर ट्राफिक पोलिस तुम्हाला त्रास देत असतील किंवा छळ करत असतील तर संबंधित पोलिस ठाण्यात त्याच्या चुकीच्या वर्तनाबद्दल लेखी तक्रार करू शकता. आपण दंड भरला याचा अर्थ असा नाही की आपण वाहतूक पोलिसांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल तक्रार करण्याचा अधिकारच गमावला आहे.
आपला दंड भरून आपणही ट्राफिक पोलिसाची तक्रार करू शकता. तसेच आपणही ट्राफिक पोलिसांशी आदराने वागले पाहिजे, अन्यथा ट्राफिक पोलीस कारवाईत आणखी एक अपराधाचा समावेश करू शकतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.