जवळजवळ प्रत्येक प्रेमी युगुल चुंबनाचा आनंद घेत असते. कदाचित आपणही घेतला असेल. आपल्या आवडत्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्याचा चुंबन हा एक चांगला मार्ग आहे. आपल्या मनातल्या भावना शब्दात जितक्या मांडता येत नाहीत, त्या न बोलताही चुंबनाच्या माध्यमातून जोडीदाराला सांगता येतात.
पण हेच चुंबन आरोग्यासाठी सुद्धा किती चांगलं असतं हे तुम्हाला माहित नसेल. तसेच चुंबनाबद्दलच्या इतरही काही महत्वाच्या फॅक्टस आपल्याला माहित असायला हव्यात…
१) चुंबनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. चुंबनाच्या वेळी एकमेकांच्या लाळेद्वारे वेगवगेळ्या प्रकारच्या जिवाणूंची देवाण घेवाण होते, जे आपल्या शरीराला नवीन बॅक्टेरिया आणि जंतूंचा प्रतिकार करण्यासाठी मजबूत बनवतात.
२) चुंबन हे हातात हात मिळवण्यापेक्षा अधिक स्वच्छ असते. माणसाच्या लाळेतील स्राव नैसर्गिकरित्या जंतुनाशक म्हणून काम करतो. ३) चुंबन घेणे ही आपल्या आयुष्यातील आनंदाची घटना असते. आपल्या आजूबाजूचा गंध, बॅकग्राउंड संगीत, ते ठिकाण या सर्व गोष्टी त्या चुंबनाला अर्थपूर्ण बनवतात.
४) चुंबन करतेवेळी आपल्या चेहऱ्याचे ३० स्नायू काम करतात. त्यामुळे त्वचा घट्ट होते. ५) तासभर चुंबन करण्याने शरीरातील १२० कॅलरीज बर्न होतात. आपला रक्तदाब कमी होतो आणि ऑक्सिजनचा प्रवाह वाढवते. आपल्या हृदयासाठी हे खूप चांगले असते.
६) चुंबन करताना लव्ह हार्मोन ऑक्सिटोसिन स्रवतो. हा दोन लोकांमध्ये अटॅचमेंट आणि समजूतदारपणा निर्माण करतो. प्रेमाची भावना वाढीस लागते. नाते अधिक काळापर्यंत टिकवण्यासाठी याचा उपयोग होतो.
७) चुंबन करताना डोपामाईन नावाचा आनंद निर्माण करणारे हार्मोन स्रवते. त्यामुळे चुंबनानंतर आपल्याला झोप किंवा भूक लागत नाही. ८) चुंबन करतेवेळी एंडोर्फिन नावाचे हार्मोन्सही सर्वे, ज्यामुळे माणसाच्या मनावरील तणाव कमी होतो. सकाळची सुरुवात चुंबनाने केल्यास आपला संपूर्ण दिवस सकारात्मक जातो.
९) स्रियांची मासिक येण्याआधी त्यांना रोमँटिक किसिंग जास्त आनंद देते. त्यामुळे किसिंग चांगल्या पद्धतीने झाल्यास गर्भवती राहण्याची शक्यता आस असते.
१०) चुंबन करतेवेळी आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या सैल पडतात, त्यामुळे एखाद्या गोष्टीवर नजर टिकवून ठेवणे अवघड होऊन बसते. सर्व काही अंधुक दिसू लागते. त्यामुळे चुंबन करताना डोळे आपोआप बंद होतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.