वयाच्या 21 व्या वर्षी ग्रॅज्युएशन, 23 व्या वर्षी नोकरी आणि 28 ला लग्न हा क्रम जवळपास सर्वांसाठी एक ठरून गेला आहे. बरोबर आहे की नाही? हो पण या पुढे नाही. तसेच काही काही जण तर फार लवकरच लग्न करून संसाराला लागलेले सध्या दिसत आहेत. काही काही जण तर विशीतच पालक बनत आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना अजून या वयात स्वतः रोजी रोटी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
ज्या लोकांना लवकर लग्न करण्यात रस नाहीये, अशा लोकांसाठी आयुष्यात नवीन काही करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. चला तर आज जाणून घेऊया खासरेवर अशा काही गोष्टी ज्या विशीत लग्न करण्यापेक्षा खूप चांगल्या आहेत.
लग्न करून हनिमूनला जायचं. छान छान फोटो काढून ते फेसबुकवर पोस्ट करून आपल्या मित्रांना दाखवायचं. नयनरम्य स्थळांना भेट देण्यासाठी लग्नच करावे हे बंधनकारक नाही ना. त्यापेक्षा तुम्ही एकटे जा आणि या नयनरम्य स्थळांना भेटी देऊन मज्जा लुटा. तुम्हाला भरपूर सुंदर अनुभव येतील आणि आठवणी कायम सोबत राहतील.
2. तुमच्या छंदाना वेळ द्या-
पुस्तक वाचणे, स्टँप जमा करणे किंवा काही तरी नवीन बनवणे. अशा प्रकारचे अनेक छंद आपल्याला असतात. मित्रांनो हे वय या गोष्टीसाठी अगदी योग्य आहे. तुंही विशीत निवांत आपल्या छंदाना वेळ देऊ शकता. आणि यात तुम्हाला जास्त आनंद सुद्धा मिळेल.
3. तुमच्या शरीराची काळजी घ्या-
विशीचे वय हे सर्व गोष्टीसाठी खूप चांगले असते. या वयात तुम्ही व्यायाम करून चांगली तब्येत बनवू शकता. तुम्ही जर विशीच्या वाउत जर घाम गाळला तर तुम्हाला आयुष्यभर तंदुरुस्त राहण्यासाठी मदत मिळेल. त्यामुळे या वयात जास्तीत जास्त वेळ व्यायाम करण्यास आणि आपल्या शरीराची निगा राखण्यासाठी द्या.
4. एकटे रहा-
माणूस जेव्हा एकटा एकटा राहतो तेव्हा त्याला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. गोष्टींचे महत्व कळायला लागते. आयुष्यातील अनेक महत्वाचे धडे तुम्हाला या वयात एकटे राहिल्याने मिळतील. त्यामुळे प्रत्येक तरुणाने आयुष्यात एकदा तरी एकटे राहण्याचा अनुभव घेतला पाहिजे.
5. आवडीची नोकरी शोधा-
बरेच जण आपले शिक्षण संपल्यानंतर काही तरी नोकरी असावी म्हणून नोकरी करत असतात. त्यामुळे अनेकांचे या नोकरीमध्ये मन रमत नाही. या अशा दम घोटणाऱ्या नोकऱ्या करण्यापेक्षा अशी नोकरी शोधा जे तुम्हाला समाधान देईल. आवडीच्या काम तुम्ही करत असाल तर तुम्हाला जास्त मेहनत करायला काही वाटणार नाही.
6. पैसे वाचवा-
तुमच्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी पैसे वाचवा, तुमची आवडली कार घेता येईल किंवा आई वडिलांना जगभ्रमंती वर पाठवण्यासाठी पैशाची बचत करा. तुमच्या आवडत्या वस्तुपैकी अशा अनेक गोष्टी असतात न्या तुम्ही केवळ पैसे नसता म्हणून घेत नाहीत. आपल्याला लहानपणी जशी पैसे बचत करून त्या सेविंग बॉक्समध्ये टाकायला आवडायचं तसं विशीत पण करून पैसे वाचवा व आवडीच्या गोष्टी करा.
7. नवीन गोष्टी शिका-
आपल्या प्रत्येकाच्या मनात अनेक नवीन गोष्टी कण्याच्या इच्छा असतात. पण आपल्याला त्या करायला जमत नाही म्हणून राहून जातात. या वयात तुम्ही या गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न करा. जसे की तुम्हाला जेवण बनवायला आवडत असेल तर जेवण बनवायला शिका, पोहणे, झुंबा, पॅराग्लायडिंग या साठी हाच योग्य वेळ आहे. नवीन गोष्टी ट्राय करा ,चुकांमधून शिकायला मिळेल, हळू हळू भीती नष्ट होईल आणि आनंद ही मिळेल.
8. प्राणी पाळा-
बाहेरून घरी आल्यानंतर घरात प्रवेश करताच लहान लहान पिल्यांनी केलेले स्वागत काही औरच असते. प्राण्यासोबत घालवलेला वेळ हा खुप अमूल्य असतो.
9. पार्ट्या करा-
आयुष्य हे एक खूप मोठी पार्टी आहे. आयुष्य आहे तोपर्यंत आनंदाने ते जगा.
10. आपल्या आई-वडिलांबरोबर वेळ द्या-
शेवटचे पण खूप महत्वाचे म्हणजे आपल्या आई-वडिलांबरोबर वेळ देने. आई-वडिलांसाठी काही तरी चांगले करण्यासाठी प्रयत्न करा. तो वेळ आठवा जेव्हा तुम्हाला त्यांनी मोबाईल किंवा बाईक घेऊन दिली होती. ज्यावेळी तुमच्या अर्ध्यापेक्षा जास्त मित्रांकडे या गोष्टी नव्हत्या. ते तुमच्या आनंदासाठी सर्व प्रयत्न करतात तर मग तुम्ही पण त्यांच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.