भगवान शंकराने श्रावण महिन्यात देव आणि दानवांमध्ये झालेल्या समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर आलेले विष प्राशन केल्याची कथा आपल्याला माहित आहे. आपल्या देवाच्या शरीरातील विषाचा दाह कमी करण्यासाठी शिवभक्त भगवान शंकराला जल अर्पण करतात.
त्या काळापासून कावडीमध्ये पाणी आणून शिवलिंगाला जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. पण एका मुस्लिम व्यक्तीला ही कावड भरुन आणून भगवान शंकराला जलाभिषेक करण्याची घटना महागात पडली आहे. त्याच्या या कृतीबद्दल त्याला मुस्लिम समुदायाने बहिष्कृत केले आहे. पाहूया काय आहे हे प्रकरण…
कोण आहे ती मुस्लिम व्यक्ती ?
साबीर हुसेन असे त्या मुस्लिम युवकाचे नाव असून तो उत्तरप्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील दोपहरिया गावातील रहिवासी आहे. १२ ऑगस्ट २०१९ रोजी साबीरने हरिद्वार येथून गंगा नदीतुन कावड भरून आणली.
भगवी वस्त्रे घालून तो आपल्या दोपहरिया गावातील शिवमंदिरात गेला आणि तिथल्या शंकराच्या पिंडीला त्याने जलाभिषेक केला. त्यानंतर गावातील लोकांसाठी त्याने भंडारा सुद्धा आयोजित केला होता. साबीरची इच्छा होती की हिंदू-मुस्लिम मिळून राहावेत आणि त्यांनी एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी व्हावे.
मुस्लिम समुदायाने केले बहिष्कृत
आपल्या समुदायातील एक व्यक्ती हिंदूंच्या मंदिरात जाऊन पूजा करतो ही गोष्ट त्या गावातील काही अज्ञानी मुस्लिम लोकांना रुचली नाही. ते लोक साबीर हुसेनवर चिडले आणि त्यांनी साबीरवर बहिष्कार टाकला. मस्जिदमध्ये नमाज पाडण्यासही बंदी घातली.
एवढेच नाही त्या लोकांनी साबीरला मुस्लिम मानायलाही नकार दिला. एवढ्यावर ते थांबले नाहीत, त्यांनी साबीरला गाव सोडून जाण्याचा इशारा दिला आहे. परंतु गावातील हिंदू लोकांनी साबीरच्या पाठीशी ठामपणे उभा राहत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.