मुंबई विरुद्ध पुणे हा वाद बर्याच काळापासून सुरु आहे आणि हा वाद एवढ्यात तरी थांबेल याची काही चिन्हे दिसत नाहीत. आयपीएल क्रिकेटच्या मैदानापासून साहित्य, भाषा, शिक्षण, इतिहास, भूगोल, अमुक तमुक असा सगळ्या विषयांमध्ये या वादाच्या पाऊलखुणा दिसतात. अर्थातच हा वरवरच्या श्रेष्ठत्वाचा वाद आहे, त्यात गंभीर असे काही नाही. गप्पा, चर्चा, काव्य किंवा सोशल मीडियातून त्यावर दोन्ही बाजूंनी अनेक युक्तिवाद मांडले जातात.
परंतु आमच्यासाठी एकच स्पष्ट विजेता आहे – मुंबईला फक्त पराभूत करता येणार नाही ! यामागे असणारी कारणेही वाचा…
१) पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येही मिळते चांगली वागणूक : मुंबईतील लोकांची बांधिलकी ही अशी काहीतरी गोष्ट आहे जिची पुण्यात पुनरावृत्ती होण्याची आपण केवळ आशाच बाळगू शकतो. निश्चितच लोकल ट्रेन आणि बेस्टच्या बस कदाचित गर्दीने भरलेल्या दिसतील, परंतु त्यातही नेहमी आपल्यासाठी एक जागा अवश्य मिळेल.
२) बीच : पुणेकरांनो माफ करा, हे असे एक क्षेत्र आहे जिथे तुम्ही मुंबईसोबत स्पर्धा करू शकत नाही. ३) स्ट्रीट फूड : स्ट्रीट फूडच्या बाबतीत इथले रस्ते फार पुढे आहेत. तुम्ही मुंबईत कोठेही असलात तरीही आपण नेहमीच तोंडाला पाणी सोडणाऱ्या स्ट्रीट फूडच्या जवळच असा, जे तुम्हाला नक्की समाधान देते.
४) दिवसभर दुकाने खुली : पुणेकरांनो, तुम्ही दुपारी १ ते ४ मध्ये दुकाने बंद करुन खुशाल वामकुक्षीचा आनंद घ्या, आमच्याकडे दिवसभर कधीही दुकाने सुरूच असतात. ५) मुंबई नाईटलाइफ : रात्रीचे ११ वाजले की पुण्यात दुकाने बंद होतात, पण मुंबईला कधीही न झोपणारे शहर म्हणतात. ६) क्रिकेट : पुण्यात मैदान असून त्यावर क्रिकेट खेळले जात नाही, याउलट मुंबईकरांना दोन दोन मैदानावर क्रिकेट सामने पाहता येतात.
७) बॉलिवूड : जेव्हा मुंबईत तुम्ही सिग्नलला थांबता तेव्हा तुम्हाला बाजूच्या गाडीत रणबीर आणि दीपिकाही बघायला मिळतात, यापेक्षा अजून बॉलिवूडबद्दल काय सांगावे ? ८) सोशल मीडियावर कायदे : ट्विटर सारख्या सोशल मीडियावरूनही मुंबई पोलिस कायद्याच्या सूचना करत असतात. ९) स्वप्नांचे शहर : व्यवसाय, चित्रपट, वित्त, कला या क्षेत्रात करियर करण्यासाठी लोक मुंबईत येतात. लोक पुण्यात तेव्हाच येतात तेव्हा त्यांना कुठे ऍडमिशन घ्यायचे असेल किंवा न्या काई कार्यक्रम असेल.
१०) संस्कृती, भाषा आणि पाककृतींचा अनोखा संगम : १.८४ कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहराने महाराष्ट्राची संस्कृती टिकवून ठेवताना विविधतेत एकतेचे प्रदर्शनही घडवले आहे. पुणेकर घराबाहेर पाट्या लावून स्वतःचे वेगळेपण जपतात.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.