जर एखाद्या हॉटेल मध्ये तुम्ही गेले आणि ऑर्डर देताना मेनू कार्ड मध्ये बॉलीवूड मधील प्रसिद्ध डायलॉग तुम्हाला वाचायला मिळेल किंवा सिने अभिनेत्याचे नाव दिसेल तर आश्चर्य वाटेलच ना? असेच काही झाले आहे मुंबई मध्ये येथील एक हॉटेल तिथल्या मेनू मुळे चर्चेत आळे आहे.
मागच्या काही दिवसांपासून मुंबईमधील एका रेस्टॉरंटची खूप चर्चा सुरु आहे. “हिचकी” असे या रेस्टॉरंटचे नाव असून इथे फक्त बॉलिवूड कलाकारांच्या नावेच डिश मिळतात. इथे तुम्हाला “गोगो तुस्सी ग्रेट हो” नावाच्या थाळीचा आस्वाद घेऊ शकता.
या थाळीच्या नावाने तुमच्या बॉलिवूडमधील जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील. तसे पाहता हा विषय इथेच संपत नाही, हे रेस्टॉरंट पूर्णपणे बॉलिवूड चाहत्यांसाठीच बनवण्यात आले आहे. पाहूया अजून काय खास आहे.
मुंबईच्या या हिचकी रेस्टॉरंटमध्ये बॉलिवूड कलाकारांच्या नावे अनेक डिश उपलब्ध आहेत. त्यामध्ये परिणीती बटर मसाला, शाहरुख नान, आलिया भात, सलमान पान, प्रियांका खोबरा चटणी, कॉफी विथ गरम, अनुपम खीर, कट रही है ना सॅलड, चिकना राणावत मसाला अशा डिश आहेत. “गोगो तुस्सी ग्रेट हो” थाळी सोबतच इथे “कितने आलू थे” आणि “कबाब में हड्डी” यासारख्या चविष्ट डिश देखील मिळतात.
एकंदर पाहता रेस्टॉरंट मध्ये सगळ्या डिश या बॉलिवूड डायलॉग किंवा बॉलिवूड कलाकारांच्या नावाने आहेत. हिचकी हॉटेलचे ब्रँड अर्जुन कपूर असून त्यांचे म्हणणे आहे की हिचकीच्या हृदयातच बॉलिवूड वसले आहे. “गोगो तुस्सी ग्रेट हो” थाळीच्या माध्यमातून आपल्याला हिंदी सिनेमाच्या सर्वात स्मरणीय खलनायक गोगोची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाल info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता