रिलायन्स उद्योगसमूहाचे मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या मुलाचे लग्न असो, त्यांचा बंगला असो किंवा पत्नी नीता अंबानींच्या वाढदिवसाला दिलेले गिफ्ट असो; मुकेश अंबानी नेहमी चर्चेत असतात.
नुकतीच महाराष्ट्रात आलेल्या पूर्वपरिस्थितीवेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांच्या रिलायंस इंडस्ट्रीज कडून ५ कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती. मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की एवढ्या श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानींकडे एक सेकंड हॅन्ड कारही आहे. पाहूया नेमकं काय आहे कारण…
का घ्यावी लागली मुकेश अंबानींना सेकंड हॅन्ड कार ?
मुकेश अंबानी यांच्याकडे रोल्स रॉयस कलीनन, लॅम्बोर्गिनी उरुस, बेंटले बेंटायगा यासारख्या जगातील महागड्या कार आहेत. पण त्यांच्याकडे एक सेकंड हॅन्ड टेस्ला मॉडेल एस १०० कारही आहे. ही टेस्ला कार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नावावर होण्याआधी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर होती. वास्तविक पाहता ही एक इंपोर्टेड कार आहे.
इंपोर्टेड कारला आधी कंपनीच्या नावावर रजिस्टर केले जाते आणि त्यानंतर या कारला इम्पोर्ट केल्यानंतर त्याच्या मालकाच्या नावाने रजिस्टर करावे लागते. या अर्थाने मुकेश अंबानींना सेकंड हॅन्ड कार घ्यावी लागली.
कशी आहे ही कार ?
टेस्ला मॉडेल एस १०० या कारची किंमत अमेरिकेत ९९९९९ डॉलर म्हणजेच जवळपास ७३ लाख रुपये आहे. परंतु आयात केल्यानंतर १०० % हुन अधिक आयात शुल्क भरल्यानंतर या कारची किंमत जवळपास १.५ कोटी रुपये होते.
ही एक इलेक्ट्रिक कार असून त्यामध्ये १०० किलोवॅटची बॅटरी आहे. फास्ट चार्जिंग कॅपॅसिटीच्या माध्यमातून ही कार ४२ मिनिटात जवळपास ३९६ किमीचा पल्ला गाठू शकते. १०० किमी/तास हे स्पीड गाठण्यासाठी या गाडीला केवळ ४.३ सेकंद वेळ लागतो.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.