सावधान ! कृपया आपण जिथे बसला तिथे घट्ट पकडून बसा. कारण आता जे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ते वाचल्यानंतर तुम्हाला धक्का बसू शकतो. कदाचित बसल्याजागीच तुम्ही पडूही शकता. विषय असा आहे की, आपण आजपर्यंत चॉकलेट केक, पर्सनलाईज केक, बटर स्कॉच केक आणि अनेक फ्लेवर्स बद्दल ऐकले असेल. त्यांची किंमत सुद्धा अशी असते की सर्वसामान्य लोक देखील ते खरेदी करु शकतात. परंतु ब्रिटनच्या केक डिझायनर डेबी विंगहॅमने जगातील सर्वात महागडा केक बनवला आहे.
किती आहे या केकची किंमत ?
डेबी विंगहॅमने बनवलेल्या या केकची किंमत थोडी थोडकी नाही, तर तब्बल १ कोटी रुपये आहे. बसला ना धक्का ! हो, पण हे खरे आहे. डेबीने एका पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केलेल्या मुलीच्या रुपात या केकची रचना केली आहे. हा केक बनवण्यासाठी डेबीला २५ किलो चॉकलेट, १००० खरेखुरे शुभ्र मोती, ५००० फुलं आणि १००० अंडी लागली आहेत. या केकचे वजन तब्बल १०० किलो आहे.
जगातील सर्वात महागडा केक बनवण्याचा विक्रम डेबीच्या नावावर
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जगातील सर्वात महागडा केक बनवण्याचा विक्रम डेबीच्या नावावर आहे. डेबीच्या केकेची रचना अनेकदा विचित्र असते. कधी सोफ्याच्या रुपात, कधी खुर्चीच्या रुपात, कधी घमेल्याच्या रुपात ती केक बनवते. एवढेच नाही, तर डेबी अनेक सेलिब्रिटींच्या चेहऱ्याच्या रुपातही आपले केक बनवत असते.
जगातल्या सर्वात महागड्या केकेचे अनावरण दुबईच्या ब्राईड शो मध्ये करण्यात आले आहे. पारंपारिक अरबी वधूच्या रूपात हा केक साकारला गेला असून त्यावर पाच पांढऱ्या हिऱ्यांचे ठिपके आहेत. या प्रत्येक हिऱ्याची किंमत २००००० डॉलर्स आहे. केकला “द मिलियन डॉलर वधू” हे नाव मिळाले आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.