शरद पवार नाही तर राष्ट्रवादीच्या या युवा नेत्याच्या महाराष्ट्रात झाल्या सर्वाधिक सभा!

विधानसभेसाठी महाराष्ट्रात काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या. भाजपच्या प्रचाराची धुरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, शिवसेनेच्या प्रचाराची धुरा उद्धव ठाकरे यांनी तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांच्या प्रचाराची धुरा ७९ वर्षांचे शरद पवार यांनी सांभाळली. फडणवीस, मोदी व शहा यांच्या विरोधात दमदार बॅटिंग करीत श्री. पवार यांनी महाराष्ट्र ढवळून काढला. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी झालेली बघायला मिळाली.

महाराष्ट्रात मागील १५ दिवसांपासून सर्व पक्षीय नेत्यांनी मतांचा जोगवा मागितला. जाहीर प्रचार संपला असला तरी आजची रात्र छुप्या प्रचाराची राहणार आहे. शनिवारी संपलेल्या प्रचारात भाजपने राज्यात ३३० पेक्षा जास्त सभा व रॅली घेतल्या. यापैकी १७१ सभा व रॅली या केंद्रीय नेते आणि अन्य राज्यांतील नेत्यांच्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपकडून सर्वात जास्त ६५ च्या आसपास सभा आणि रॅली घेतलेल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात एकूण ४१२ प्रचारसभा घेतल्या. उद्धव ठाकरे यांनी ८ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबरपर्यंत ५० सभा घेतल्या. तर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सभा राज्यात घेतल्या. सोनिया व प्रियंका गांधी यांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरवली असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही सभा घेत कार्यकर्त्यांना चेतना देण्याचं काम केलं.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात ५० सभा घेतल्या. तर त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी ५ सभा घेतल्या. भाजपकडून नरेंद्र मोदी यांच्या ९ सभा झाल्या, अमित शहा १८ सभा आणि नितीन गडकरी ३५ सभा झाल्या.

राष्ट्रवादीकडून शरद पवार यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी तब्बल ६० सभा घेत सर्वाना थक्क केलं. राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरी यांनी सर्वाधिक ६७ सभा घेतल्या. त्यानंतर जयंत पाटील ६५, खासदार अमोल कोल्हे ६५, छगन भुजबळ ४८, धनंजय मुंडे ३८, अजित पवार ३५ सभा आणि ५ रोड शो व खासदार सुप्रिया सुळे यांनी १२ सभा घेतल्या.

कोण आहेत सर्वाधिक सभा घेणारे अमोल मिटकरी?

राष्ट्रवादीच्या विधानसभा उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये दिसणाऱ्या या वक्त्याचे नाव अमोल मिटकरी आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पदावर काम करतात. अकोला जिल्ह्यातील कुटासा हे मिटकरी यांचे मूळ गाव आहे.

पूर्वी चरितार्थासाठी घरची शेती आणि किराणा मालाचे दुकान चालवत असतानाच मिटकरींनी वक्तृत्वकलेत कौशल्य मिळवले. १२ जानेवारी २०१२ च्या सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमात मिटकरींनी जबरदस्त भाषण करुन आपल्या वक्तृत्वाची छाप निर्माण केली.

संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अमोल मिटकरी महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात गेले. संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाच्या नेत्यांसोबत मतभेद झाल्यानंतर अमोल मिटकरींनी पूर्वीच्या संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेत प्रवेश केला. संभाजी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर अमोल मिटकरींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.