आतापर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपल्या सर्वांच्या तोंडात एकाच नाव असायचे, बिल गेट्स ! पण आता अचानक एका व्यक्तीचे नाव जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आले आहे, जेफ बोजेस ! अमेझॉन कंपनीचा कर्ताधर्ता आणि मुख्य कार्यकारी प्रमुख जेफ बोजेस मागच्या महिन्यात तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आला होता.
१४ जानेवारी ते १६ जानेवारी जेफ भारतात होता. याकाळात तो राजघाटावर गेला, बॉलिवूडमधील अनेक लोकांना भेटला. परंतु जेफचा भारत दौरा एकंदर म्हणावा असा झाला नाही, कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदींशी त्याची भेट होऊ शकली नाही. त्याला मोदींना भेटायचे होते, परंतु एक महिन्याआधीच जेफची अपॉइंटमेंट रद्द करण्यात आली.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची मोदींशी होणारी भेट रद्द का करण्यात आली ?
जेफ आणि मोदी यांची भेट रद्द होण्यामागे सरकारच्या नाराजीचे कारण सांगण्यात येत आहे. जेफ बोजेस हा अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राचा मालक आहे. या वर्तमानपत्राच्या संपादकीय लेखांमध्ये सातत्याने मोदी सरकारच्या कारभारावर टीका करण्यात आली आहे. २०१९ मध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार पुन्हा सत्तारुढ झाल्यानंतर यामध्ये वाढ झाली. जम्मू काश्मीर मधून कलम ३७० हटवल्यानंतर वर्तमानपत्राने आक्रमकपणे या निर्णयाच्या विरोधात अनेक लेख छापले.
बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने मोदींना दिलेल्या “ग्लोबल गोलकीपर” पुरस्कारानंतर वर्तमानपत्राने दिलेली प्रतिक्रिया सरकारला नाराज करणारी होती. CAA, NRC कायद्यांबाबत वर्तमानपत्राने अनेक टीका करणारे लेख छापले होते. १३ डिसेंबर २०१९ रोजीच्या आर्टिकलची हेडलाईन “भारताचा नवीन कायदा कोट्यवधी मुस्लिम नागरिकांना नागरिकत्व न देता सोडून देईल” अशी होती. सरकारने याबद्दल CAA कायदा चुकीच्या पद्धतीने मांडण्यामागे चांगला उद्देश नाही अशा शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे जेफ बोजेस भारतात आल्यानंतर भाजप आणि निगडीत लोकांनी त्याच्या भारत दौऱ्यावर आला असताना त्याला न भेटणेच पसंत केले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला आपल्याकडील खास माहिती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.