राज्यात सरकार स्थापनेच्या मुद्यावरून भाजप- शिवसेना युतीमधील रस्सीखेच सुरूच आहे. दोन्ही पक्षातील सत्तास्थापनेचा तिढा संपायचं नाव घेत नाहीये. निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन १२ दिवस झाला हा घोळ अजून संपलेला नाहीये.
शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम असून भाजप देखील मुख्यमंत्रीपद सोडून बाकीचे वाढीव मंत्रिपद द्यायला तयार आहेत. दरम्यान कोण होणार मुख्यमंत्री? या प्रश्नाचा तिढा सुटला नसताना भाजप आणि शिवसेनेला सरकार स्थापन करण्यास अपयश आलं तर, आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे येऊ शकते अशी बातमी आली.
असं झाल्यास कॉंग्रेससोबत शिवसेना NCP ला पाठींबा देण्याच्या चर्चा आहेत. असं झाल्यास शरद पवार मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असं काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं.
शरद पवार हे आज कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेणार आहेत. या बैठकीत काय निर्णय होतो हे बघणे औत्सुक्याचे आहे. या बैठकीत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार का याचा निर्णय होणार आहे.
तर हा आमदार देणार राजीनामा-
राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यात घवघवीत यश मिळाले. लोकसभेला शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हे यांनी बाजी मारली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातील ६ पैकी ५ उमेदवार निवडून आले. जुन्नर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अतुल बेनके यांनी बाजी मारली.
दरम्यान शरद पवार मुख्यमंत्री होणार असतील तर आपण आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार असल्याचं अतुल बेनके यांनी सांगितलं आहे. अतुल बेनके यांनी शिवसेनेच्या शरद सोनावणे यांचा पराभव केला.
“मागील पाच वर्षांत राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हेच बळिराजाला न्याय देऊ शकतात. सध्याच्या राजकीय स्थितीत शरद पवार मुख्यमंत्री झाल्यास त्यांच्यासाठी जुन्नर विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा देण्यास मी तयार आहे,” असे मत नवनिर्वाचित आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले.
शरद पवार मुख्यमंत्री होणार?
शरद पवार मुख्यमंत्री होणार या चर्चेबद्दल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट नकार देत पूर्णविराम दिला. दरम्यान, सोनिया गांघी आणि शरद पवार हे चर्चेदरम्यान राज्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करतील, त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ असंही पवार म्हणाले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.