बॉलिवूडमध्ये प्रत्येक शुक्रवारी किमान एखादातरी चित्रपट प्रदर्शित होत असतो. एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो, तर एखादा फ्लॉप होतो. जगाच्या वेगवेगळ्या भागात चित्रपटांचे शूटिंग चालते. कथानकाच्या अनुरुप स्थळांची किंवा गोष्टींची निवड केली जाते. त्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात.
आता एवढे मोठे चित्रीकरण म्हणल्यावर थोड्याफार चुका होणारच ! परंतु चित्रपट पाहत असताना आपण त्याच्या कथेत इतके हरवून जातो की, चित्रीकरणातल्या अगदी छोट्या छोट्या काही चुका आपल्या लक्षात येत नाहीत. आज आपण अशाच काही चित्रपटांविषयी पाहणार आहोत…
१) दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे :
१९९५ मध्ये शाहरुख खान आणि काजोल यांनी भूमिका साकारलेला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं आणि चित्रपटाने अनेक रेकॉडही नोंदवले.
पण या चित्रपटात एकछोटी चूक होती. संपूर्ण चित्रपटात पंजाबमधील कथा दाखवली होती, पण चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये आपटा रेल्वेस्टेशनचा बोर्ड दिसतो. आपल्या माहितीसाठी सांगतो की आपटा हे रेल्वेस्टेशन महाराष्ट्रात आहे.
२) 3 इडियट्स :
२००९ मध्ये आलेल्या आमिर खानच्या ३ इडियट्स चित्रपटातही एक चूक होती. चित्रपटातील आर.माधवन दहा वर्षांपूर्वीची आठवण सांगत असतानाचा एक सिन आहे. त्यात यूट्यूबच्या मदतीने बाळंतपण करताना दाखवले आहे. आता चित्रपट जर २००९ मध्ये आला असेल आणि दहा वर्षांपूर्वीचे युट्युब त्यात दाखवले असेल तर ते चूक आहे. कारण युट्युबची सुरुवातच मुळात २००५ मध्ये झाली होती.
३) रॉकस्टार :
रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी यांचा अभिनय असणारा २०११ मधला रॉकस्टार चित्रपट आणि त्यातली गाणी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. त्यातल्या साड्डा हक गाण्याच्या सुरुवातीला एक चूक आहे.
गाण्याच्या सुरुवातीला जॉर्डनच्या (रणबीर कपूर) बातम्या वर्तमानपत्रात छापलेल्या दाखवल्या आहेत, पण बारकाईने बघितल्यास लक्षात येते की त्या बातम्यात केवळ रणबीरचा फोटो छापला आहे, इतर मजकूर कुठल्यातरी महानगरपालिकेच्या संबंधित आहे.
४) भाग मिल्खा भाग :
२०१३ मध्ये मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारित “भाग मिल्खा भाग” चित्रपट आला होता. त्या चित्रपटात १९५० ते १९७० दरम्यानचा काळ दाखवला आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये सोनम कपूर डान्स करताना दिसत आहे, पण त्याचवेळी पाठीमागे मोबाईल टॉवर दिसला. जर चित्रपट १९५०-७० या काळातील असेल तर त्यावेळी मोबाईल टॉवर कुठून आले ?
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.