मीनाक्षी शेषाद्री सध्या कुठे असते ? वाचल्यावर विश्वास बसणार नाही

९० च्या दशकांत रिलीज झालेल्या चित्रपटांची बात काही औरच होती. आजदेखील त्या चित्रपटांची आठवण काढली जाते. चित्रपटातील कलाकारही एकदम साधे वाटायचे. 90s चे दशक खरोखर सगळ्यांसाठी आठवणींचे दशक होते. या दशकाने हिंदी चित्रपट सृष्टीला खूप काही दिले. या दशकातील चित्रपटांच्या कथा आजही लोकांच्या तोंडपाठ आहेत. त्या चित्रपटांनी लोकांच्या हृदयात जागा केली. त्यावेळी एक चित्रपट आला, जो पूर्णपणे महिलांच्या विषयवार केंद्रित होता. त्याचे नाव दामिनी !

बॉलिवूडची दामिनी

१९९३ मधील दामिनी चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्रींचे नाव आहे मीनाक्षी शेषाद्री ! या चित्रपटासाठी मीनाक्षीला फिल्मफेअर बेस्ट ऍक्टिंगसाठी नामांकनही मिळाले होते. या चित्रपटात एका बलात्कार पीडितेची भूमिका तिने साकारली होती. या चित्रपटापासून मीनाक्षी बॉलिवूडची दामिनी म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांनतर १९९६ मधील “घातक” चित्रपटानंतर मीनाक्षीने बॉलिवूडला रामराम ठोकला. त्यानंतर ती कुठल्या चित्रपटात किंवा ऑनस्क्रीन दिसली नाही.

सध्या मीनाक्षी कुठे असते ?

१९९५ मध्ये मीनाक्षीने अमेरिकेतील हरीश मैसूर नावाच्या बँकरसोबत लग्न केले आणि ती अमेरिकेच्या टेक्सास शहरात स्थायिक झाली. त्यानंतर तिच्या नवऱ्याचे पोस्टिंग वॉशिंग्टन येथे झाले. तेव्हापासून मीनाक्षी वॉशिंग्टनमध्ये असते. तिला जोश नावाचा मुलगा आणि केंद्रा नावाची मुलगी आहे.

तिथे तिचे “चेरिस डान्स स्कुल” आहे. चार वर्षांपूर्वी ऋषी कपूरने तिचा एक फोटो शेअर करुन हिला ओळखून दाखवा असे चॅलेंज केले होते. आपण पाहिलेली मीनाक्षी आणि आताची मीनाक्षी खूप वेगवेगळ्या दिसतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.