कॉलेजमध्ये शिकवत असताना “त्यांनी” शोधून काढले प्लास्टिकपासुन रस्ते बनवण्याचे तंत्रज्ञान

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की एकदा तयार झालेले प्लास्टिक पूर्णपणे नष्ट होण्यास हजारो वर्षे लागतात. यामुळेच आज प्लास्टिक कचरा ही मानवजातीसमोरील सर्वात मोठी समस्या बनली आहे. एकीकडे जगभरातील लोक यावर उपाय म्हणून संशोधन करत आहेत, तर दुसरीकडे अशी एक भारतीय आहे ज्याने ना केवळ प्लास्टिक कचर्यावर उपाय शोधला आहे, त्यासोबतच देशातील रस्तेव्यवस्था सुधारण्यासाठीही महत्वपूर्ण संशोध केले आहे. पाहूया भारतातील या प्लास्टिक मॅनचे महत्वपूर्ण संशोधन…

प्लॅस्टिक मॅन ऑफ इंडिया
राजगोपालन वासुदेवन हे मदुराई विद्यापीठाशी संलग्न संबंधित असलेल्या थियागराजर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. कॉलेजमधील विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे धडे देत असतानाच त्यांनी प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वर्षे संशोधन केले आणि २००२ साली त्यांना प्लास्टिकच्या कचर्‍यापासून रस्ते बनवण्याचे तंत्र सापडले. आपल्या या शोधाबद्दल त्यांनी तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांना माहिती दिली. त्यांच्या मदतीने राजगोपालन यांनी या शोधाचे पेटंट मिळवले. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आज देशातील अनेक राज्यांमधील खेड्यांमध्ये रस्ते बनविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देखील हे तंत्रज्ञान वापरत आहे. या तंत्रज्ञानामुळे देशातील कचरा आणि रस्ते या दोन्ही समस्यांचे निराकरण करण्यात मदत मिळत आहे. या तंत्रज्ञानाने भारतात आतापर्यंत सुमारे १ लाख किमीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत आणि इतर अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे. सन २०१८ मध्ये भारत सरकारने या तंत्रज्ञानाचा शोध लावल्याबद्दल वासुदेवन यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे.

वासुदेवनच्या या तंत्रज्ञानाने जगभरातील लोकांचेही लक्ष वेधून घेतले. अनेक देशांनी ते तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता. पण वासुदेवन यांनी त्यांना ते तंत्रज्ञान दिले नाही. त्यांनी भारत सरकारला दान केले. भारत सरकारच्या मदतीने आता या तंत्रज्ञानाद्वारे अनेक देशांमध्ये रस्ते तयार केले जात आहेत. प्लॅस्टिक मॅन ऑफ इंडियाच्या वासुदेवन यांना आमचा सलाम !

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला आपल्याकडील खास माहिती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.