पैज जिंकण्याच्या नादात ५० अंडी खाताना त्याने गमावला जीव

आपल्यापैकी बरेच जण गंमत म्हणून अनेकदा पैजा लावत असतात. गप्पागप्पांमध्ये “मी पैज लावून सांगतो, लावतो का पैज” अशा गोष्टी सुरु असतात. मग कधी पैसे तर कधी जेवणखाण्याच्या किंवा वस्तूंच्या बदल्यात या पैजा लावल्या जातात.

निवडणुकीतील स्टॅम्पपेपरवर लिहून लावलेल्या पैजा आपण पहिल्या आहेत. काही लोकांना तर प्रत्येक गोष्टीत पैजा लावण्याची सवयच असते. परंतु कधीकधी या पैजा महागात पडण्याची देखील शक्यता असते. अशीच एक घटना जौनपुरमध्ये घडली असून पैज लावण्याच्या नादात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

काय होती पैज ?

उत्तरप्रदेशमधील जौनपुरमध्ये बीबीगंज नावाची एक बाजारपेठ आहे. तिथे शाहगंज कोतवाली क्षेत्रातील अर्गुपुर कलां धौरहरा गावात राहणारे सुभाष यादव हे ४२ वर्षांचे गृहस्थ ट्रॅक्टर आणि बोलेरो वाहन भाड्याने देण्याचा व्यवसाय करत होते.

१ नोव्हेम्बर रोजी सुभाष आपल्या मित्रासोबत बाजारात अंडी खाण्यासाठी गेले. त्यावेळी कोण किती अंडी खाऊ शकतो यावर चर्चा रंगली आणि त्यातूनच पैज लागली. ५० अंडी आणि १ बाटली दारु संपवणाऱ्याला २००० रुपये देण्याची ही पैज होती.

पैजेचा नादात गेला जीव

गमतीगमतीने सुभाष यादवांनी पैजेत भाग घेतला. लोकांची गर्दी झाली. सुभाष यादवांनी एक एक अंडे खायला सुरुवात केली. प्रत्येक अंडे खाल्ले की लोक ओरडून टाळ्या शिट्ट्या वाजवून सुभाषला प्रोत्साहन देत होते. सुभाषने कशीबशी ४१ अंडी खाल्ली. ज्यावेळी त्यांनी ४२ वे अंडे खाल्ले, तेव्हा ते अचानक बेशुद्ध पडले. जमलेले लोकांत शांतता पसरली. लोकांनी सुभाष यांना उचलून दवाखान्यात नेले. पण रात्री उशिरा उपचारादरम्यान सुभाषचा मृत्यू झाला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.