मटण हा कित्येकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मटणाचे नाव जरी घेतलं तरी झणझणीत मसाला घालून बनवलेल्या मटणाचे ताट आपल्या डोळ्यांसमोर येऊन तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. दुकानावर मटण विकत आणायला गेल्यावर नळी, कलेजी, मांडी, चॉप, वजडी, भेजा, कपुरा, तिळवणासाठी जी घासाघीस केली जाते, ती हाताला ओघळ येईपर्यंत मटणाचा रस्सा वरपुन खाण्यासाठीच ! पण सगळ्या मटणप्रेमींसमोर असणारा सध्याच्या घडीचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, मटणाचे भाव दिवसेंदिवस का वाढत चालले आहेत.
सातत्याने का वाढत आहेत मटणाचे भाव ?
बेळगाव मटणविक्रेता वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षांचा मटणाचे भाव का वाढत आहेत याविषयीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार नोकरी, व्यवसाय किंवा प्रवासाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडणारे लोक जेवणात मटणाला प्राधान्य देतात.
साहजिकच मटणाची मागणी वाढल्यामुळे किंमतही वाढली आहे. दुसऱ्या बाजूला बकरे, बोकडांच्या चामड्याच्या फॅक्टरी बंद झाल्याने चामड्याची विक्री कमी झाली आहे. चामड्याचा रेट ३०० वरुन १० रुपयांपर्यंत आल्यामुळे मटण विक्रेत्यांनी मटणाचे भाव वाढवले आहेत. याशिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर बकऱ्यांचा आणि बोकडांचा बळी गेल्याने बाजारात त्यांची आवक कमी झाली आहे. कमी पुरवठ्यामुळेही भाववाढ झाली आहे.
ही देखील आहेत मटणाचे भाव वाढण्याची कारणे
देशातील महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यात गोवंशहत्या बंदी कायद्यामुळे गोमांस खाणारे लोक मटण आणि चिकनकडे वळले आहेत. अचानक मटणाची मागणी वाढल्यामुळे मटणाच्या दरात वाढ होत आहे. याशिवाय आषाढानंतर कार्तिक महिन्यापर्यंत अनेक सण उत्सव असल्याने त्यापूर्वीच मटणाला मागणी वाढते आणि त्यापाठोपाठ मटणाचे दरही वाढतात.
तसेच थंडीच्या दिवसात नदी किंवा समुद्रातील मासे तळाशी जातात, त्यामुळे मासेमारीत घेत होते. त्यामुळे ऊर्जेसाठी खवय्ये मांसाहाराकडे वळतात, त्यामुळे मटणाला मागणी वाढते आणि मटणाचे दर वाढतात.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.