लग्नानंतरच्या वैवाहिक जीवनात नवरा बायकोमध्ये होणाऱ्या कुरबुरी स्वाभाविक असतात. पण त्या जरी किरकोळ वाटत असल्या तरी पुढे जाऊन त्याचंच रूपांतर भांडणात होत असते हे विसरलं नाही पाहिजे. किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींमुळेच संसाराची राखरांगोळी व्हायला वेळ लागत नाही. नात्यात रुसवा फुगवा असावा, त्यानेच नाते बळकट होत असते. पण कधी कधी लहान सहान कारणांवरून मोठी भांडणे होतात आणि सगळ्याच गोष्टी अवघड होऊन बसतात. त्यासाठीच भगवतगीतेसारख्या पवित्र ग्रंथातही सुखी कौटुंबिक जीवन व्यतीत करण्यासाठी ययातीच्या कथेच्या माध्यमातून आवश्यक असणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत.
ययातीची कथा
ययाती नावाच्या एका पराक्रमी राजाचा विवाह दैत्यगुरु शुक्राचार्यांनी मुलगी देवयानी हिच्याशी झाला होता. लग्नाआधी शुक्राचार्यांनी ययाती कडून देवयानी व्यतिरिक्त कुठल्याही परस्त्रीशी संबंध न ठेवण्याचे वचन घेतले होते. काही दिवसांनंतर देवयानी गर्भवती राहिली, यामुळे तिची दासी शर्मिष्ठाला ईर्ष्या वाटू लागली. तिने ययाती राजाला आपल्या जाळ्यात ओढले आणि लपून विवाह केला.
एके दिवशी शर्मिष्ठाच्या मुलाने ययातीला पिता संबोधले, तेव्हा देवयानीला ययातीने आपल्याला फसवल्याचे वडिलांना सांगितले. शुक्राचार्यांनी ययातीला त्वरित वृद्ध आणि नपुंसक होण्याचा श्राप दिला. ययातीने आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली पण त्याचे वैवाहिक आयुष्य धुळीला मिळाले होते.
भगवदगीता सुखी वैवाहिक आयुष्याबद्दल काय सांगते ?
ययातीची कथा आपण वाचली. त्या कथेच्या माध्यमातून भगवतगीतेला नेमकं काय सांगायचं आहे ? आपण जर त्या कथेचा सार बघितला तर त्यात नवरा बायकोचे एकमेकांप्रती वर्तन कसे असावे याबद्दल कथन केले आहे.
भगवदगीता तीन प्रमुख गोष्टी सांगते, “१) एकमेकांचा सन्मान करा. २) एकमेकांचा विश्वास जपा. ३) एकमेकांप्रती निष्ठा ठेवा.” ह्या तीन पैकी कुठल्याही एकीकडे दुर्लक्ष केले तर तुमचा सोन्यासारखा प्रपंच बिघडून जातो.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.