चिनी शॉर्ट व्हिडीओ ऍप्लिकेशन टीकटॉकवर सुमारे ८० कोटी युजर्स आहेत आणि त्यापैकी एक चतुर्थांश म्हणजेच २५% भारतीय युजर्स आहेत. संख्येच्या बाबतीत बोलायचे झाले तर २० कोटी. स्मार्टफोनच्या जमान्यात आपले अंगभूत अभिनय कौशल्य दाखवण्यासाठी ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंतच्या तरुणाईला टिकटॉक सारखा खूप मोठा प्लॅटफार्म मिळाला आहे.
चित्रपटांमधील डायलॉग, इंदुरीकर महाराजांच्या मिमिक्रीपासून ते वेगवेगळे स्टंट जगाला दाखवण्याचे वेड टिकटॉक तरुण पिढीमध्ये निर्माण केले आहे. इथे अनेक सेलेब्रिटीही निर्माण झाले आहेत. त्यातल्या काहींना तर चित्रपटांमध्येही काम मिळाले आहे. तरुण नेटीझन्समध्ये तुफान लोकप्रियता मिळवलेल्या टिकटॉक फेसबुकसारख्या सर्वात मोठ्या सोशल मीडिया ऍप्लिकेशनवरील युजर्स खेचून घेत आहे. मग फेसबुकचा मालक मार्क झुकेरबर्गला टिकटॉक विकत घेण्याचा विचार नक्की आला असेल. पण मार्क झुकेरबर्ग एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
मार्क झुकेरबर्गने टिकटॉकवर केले हे गुप्त काम
आपल्याला माहित आहे मार्क झुकेरबर्गच्या बुद्धीला तोड नाही. फेसबुक निर्माण करुन सगळे जग त्याने एकवटले. पण आता मार्क झुकेरबर्गला फेसुबकला टक्कर देणाऱ्या टिकटॉकच्या यशाचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी त्याने एक गुप्त काम केले आहे.
टिकटॉकवर असणारे “एट द रेट फिकंड” हे अकाऊंट स्वतः मार्क झुकेरबर्ग वापरत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. आतापर्यंत या अकाउंटवरुन एकही पोस्ट टाकण्यात आली नाही. तसेच हे अकाउंट व्हेरिफाय देखील झाले नाही. या अकाउंटला ४००० हुन अधिक फॉलोवर्स आहेत.
जगातील या सेलेब्रिटी फॉलो करतात
“एट द रेट फिकंड” या नावाचे अकाउंट सेलेना गोमेझ आणि एरियाना ग्रँडे यासारख्या ६१ सेलिब्रिटीना फॉलो करते. तसेच या अकाउंटला लॉरेन ग्रे, जैकब साटरेरियस यासारखे टिकटॉक स्टार फॉलो करतात.
बातम्या अशाही आहेत की २०१६ मध्ये ज्यावेळेस टिकटॉक हे “म्युझिकली” या नावाने लाँच झाले होते तेव्हा त्याच्या सहसंस्थापक एलेक्स झु याला मार्क झुकेरबर्गने कॅलिफोर्निया मध्ये बोलावले होते. परंतु त्यांच्यातील बोलणी यशस्वी होऊ शकली नव्हती. त्यांनतर २०१७ मध्ये “म्युझिकली”ला चायना “बाईट डान्स” कंपनीने विकत घेतले आणि त्याला “टिकटॉक” नाव दिले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.