हिंदीमध्ये बोलताना महाराष्ट्रातील नेत्यांकडून झालेल्या गमतीदार चुका

राजकीय नेता बनणे म्हणजे सोपे काम नसते. भाषणे करा, लोकांचे प्रश्न ऐका, त्यातील आशय समजून घ्या, ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा, माध्यमांना सामोरे जा, वगैरे. या सगळ्यांमध्ये तुम्हाला बोलावे लागते. त्यासाठी तुमच्याकडे किमान मातृभाषेचा आणि राष्ट्रीय भाषेचा तरी शब्दसंग्रह चांगला असावा लागतो.

अनेकदा बोलत असताना तुमच्याकडून शब्दांची सरमिसळ होते आणि त्यातून गमतीदार प्रसंग घडतात. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांकडून हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असताना घडलेल्या अशाच काही गमतीदार चुका आपण पाहणार आहोत.

१) आर.आर.पाटील : दिवंगत आर.आर.पाटील म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके आबा दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत, त्यांची माफी मागून त्यांच्याबद्दलची एक गमतीदार आठवण आम्ही तूम्हाला सांगत आहोत.

आबा गृहमंत्री असताना २००६-२००७ मध्ये पोलिसांनी एका अट्टल गुन्हेगाराला पकडल्यानंतर आबांनी त्यांचे कौतुक केले होते, तेव्हा एका हिंदी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने हिंदीमध्ये “इस मामले में सरकार आज क्या करेगी ?” असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना आबा म्हणाले, “उन्हे शिक्षा मिले इसलिये हम पुरा प्रयास करेंगे.” परंतु तुम्ही वापरलेला शिक्षा शब्द मराठी असून हिंदीत त्याचा अर्थ शिक्षण असा होतो हे निदर्शनास आणून देताच आबांनी पुन्हा नवी बाईट देऊन “सजा” असा शब्द वापरला.

२) केशरबाई क्षीरसागर : सलग तीन वेळा बीडच्या खासदार राहिलेल्या केशरकाकू क्षीरसागर यांचीही माफी मागून त्यांच्याबद्दलची एक आठवण येथे देत आहोत. खासदार असताना एका कारणाने त्या इंदिरा गांधींना भेटायला गेल्या होत्या. तेव्हा इंदिरा गांधींनी टेबलवर पेन्सिल आपटत तिथल्या शिपायावर रागवत असतानाचे दृश्य त्यांनी पाहिले.

काकू परत जायला निघाल्या, पण इंदिराजींनी त्यांना हाक मारुन बोलावून घेतले आणि विचारले, “केशरबाई आप वापस क्यू लाट रही है ?” त्यावर काकू बोलल्या, “आपने टेबलपर पेन्सिल आपटी तो मुझे लगा आपसे इस वक्त बात करना उचित नही” त्यांच्या आपटी शब्दाचा अर्थ इंदिराजींना समजला नाही. केशरकाकूंकडून बोलताना चुकून मराठी शब्द गेला आणि त्याचा अर्थ समजल्यावर इंदिराजी खळखळून हसल्या.

३) मोहन रावले : १९९८ मध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले होते. त्यांच्या विश्वासदर्शक प्रस्तावावर चर्चा चालू होती. शिवसेनेच्या वतीने खासदार मोहन रावलेंनी प्रस्तावावर बोलायला सुरुवात केली, “दोन वर्षांपूर्वीच्या विश्वासदर्शक ठरवत वाजपेयी सरकारला बहुमत मिळत नसल्याचे दिसताच अटलबिहारी वाजपेयीनीं घोषणा केली होती, मै जा राहा हूं राष्ट्रपतीजी के पास अपना त्यागपत्र देने…अटलजी कि यह बात सुंकर महाराष्ट्र के लागों के आँखो में पानी आ गया.” आंसू म्हणण्याऐवजी पानी म्हटल्याने विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये एकच हशा पिकला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.