काही अभिनेत्री आपल्या साधेपणाने प्रेक्षकांचे हृदय जिंकतात. कुठलाही बोल्ड लूक न करता, काहीहि वेगळे न करता प्रेक्षकांची मनं जिंकणं तसं कठीण होऊन बसलं आहे. पण आजही अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या साधं जीवन जगून प्रेक्षकांना भुरळ घालतात. यामधील एक नाव म्हणजे मृणाल दुसानिस.
कसदार अभिनय आणि आपल्या सौंदर्याने मृणालने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत एक चिमुरडी आपल्या वडिलांच्या कडेवर आहे. हि चिमुरडी मृणाल दुसानिस आहे. फोटोत अतिशय गोड दिसणारी मृणाल आजही तेवढीच सुंदर आहे.
तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. तिने इंस्टाग्रामवर हा तिचा आणि वडिलांचा फोटो शेअर केला आहे.
मराठी इंडस्ट्रीत सरळ, साधी आणि सोज्जवळ अभिनेत्री अशी तिची ओळख निर्माण झाली. यानंतर मृणालने तू तिथे मी, अस्सं सासर सुरेख बाई या मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. मालिकांमध्ये देखील तिला साध्या भूमिका करायला मिळाल्या ज्या तिच्या रिअल लाईफला सुद्धा सूट होतात.
वैयक्तिक आयुष्यात तिने आपला साधेपणा खूप चांगल्या प्रकारे जपला आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून तिने आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा केला. तीन वर्षांपूर्वी २५ फेब्रुवारी २०१६ रोजी तिने लग्न केले. त्यानंतर थोडा काळ अभिनयातून ब्रेक घेतला होता. ती त्यानंतर संसारात रमली होती. मृणालचे लग्न पुण्याच्या नीरज मोरे सोबत झाले. नीरज नोकरीनिमित्ताने अमेरिकेत स्थायिक आहे. या दोघांचे हे अरेंज मॅरेज आहे.
मृणाल दुसानीसचा पती नीरज मोरे सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे आणि त्याचा अमेरिकेत जॉब आहे. कांदेपोहेच्या कार्यक्रमादरम्यान मृणाल-नीरज प्रथम एकमेकांशी बोलले. मृणाल हि मूळची नाशिकची आहे. २० जून १९८८ रोजी जन्मलेल्या मृणालने मास्टर ऑफ जर्नलिझममध्ये पदवी प्राप्त केली आहे.
मृणाल मोठ्या पडद्यावरही झळकली आहे. भरत जाधव स्टारर श्रीमंत दामोदर पंत या सिनेमात ती झळकली आहे. लग्नापूर्वी नीरला मृणालविषयी काहीच माहित नव्हते. याविषयी मृणाल सांगते, नीरजने जेव्हा माझ्याविषयी गुगलवर सर्च केले, तेव्हा त्याला माझे सर्व साड्यांमधीलच फोटो दिसले. त्यामुळे तुम्ही पंजाबी ड्रेस घालता का, हा त्याने मला विचारलेला पहिला प्रश्न होता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.