भारतीय संस्कृती नुसार प्रत्येक विवाहित स्त्री हि मंगळसूत्र परिधान करते. सौभाग्याच लेण म्हणून मंगळसूत्राकडे बघण्यात येते. सामान्य व्यक्ती प्रमाणे बॉलीवूड अभिनेत्री देखील मंगळसूत्र परिधान करतात. आपले आवडते कलाकार काय घालतात, कसे वागतात हे चाहत्यांना आवडणारा विषय आहे. बॉलीवूड अभिनेत्रीनि वापरलेले ड्रेस किंवा दागिने मग फैशन म्हणून सर्वत्र वापरण्यात येतात.
सामान्य दिवशी एवढ्या फैशन करणाऱ्या अभिनेत्री आपल्या लग्नात तर विशेष कसे करता येईल याच्या प्रयत्नांत राहतात. कलाकाराचे लग्नाचे फोटो आणि वव्हिडीओ बघण्यासाठी लोकात पण मोठ्या प्रमाणात उस्तुकता असते. मागील काही वर्षात भारतात काही प्रसिद्ध अभिनेत्रीचे लग्न झाले त्यांनी परिधान केलेले दागिने व त्यांच्या किमती बघून तुम्ही नक्की अवाक होणार.
दीपिका पादुकोण- नोव्हेंबर २०१८ मध्ये दीपिका आणि रणवीर सिंग यांचे लग्न झाले. या लग्नामध्ये दीपिकाला रणवीर सिंग याने मंगळसूत्र घातले त्या मंगळसूत्राची किंमत तब्बल २० लाख रुपये एवढी होती. त्या मंगळसूत्रात काळे मोती व छोटा डायमंड सॉलिटेयर पेंडेंट लावण्यात आला होता. सिंपल आणि पारंपारिक दिसणारा हे मंगळसूत्र बघण्यालायक होते.
अनुष्का शर्मा- रब ने बना दी जोडी या सिनेमा पासून बॉलीवूड मध्ये पदार्पण केलेल्या अनुष्का व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने २०१७ मध्ये लग्न केले. त्या दोघांनी इटली मध्ये आपले लग्न केले आणि या लग्नाचे फोटो अनेक दिवस सोशल मिडीयावर तुफान वायरल होते. अनुष्काने या लग्नात तब्बल ५२ लाख रुपयाचे मंगळसूत्र घातले होते आणि हे मंगळ सूत्र फक्त डायमंड पासून बनविण्यात आले होते.
प्रियंका चोप्रा- मिस वर्ल्ड प्रियंका चोप्रा हिने अमेरिकन स्टार निक जोनास सोबत लग्न केले. तिच्या पेक्षा निक वयाने लहान आहे व त्यांच्या दोघाचे लग्न मीडियात चर्चेचा विषय ठरला होता. २०१८ मध्ये त्यांचे लग्न राजस्थान मध्ये झाले होते. प्रियंका चोप्राचे मंगळसूत्र सब्यसाची द्वारा डिजाईन केले होते. प्रियंकाचे मंगळसूत्र सोन्यापासून बनविले होते आणि त्यामध्ये डायमंडचा वापर करण्यात आला होता. अनेक बातम्या नुसार या मंगळसूत्राची किंमत २० लाखाहून अधिक होती.
काजोल- २४ फेब्रुवरी १९९९ मध्ये काजोल आणि अजय देवगन हे लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या वेळेस अजय देवगनने काजोलला दिलेल्या मंगळ सूत्राची किंमत २१ लाख रुपये एवढी होती. या दोघाचे लग्न मराठी पद्धतीने करण्यात आले होते.
ऐश्वर्या राय- २००७ मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न झाले आणि त्या काळात हे लग्न राष्ट्रीय मीडियात चर्चेचा विषय ठरले होते. काही निवडक लोकाच्या उपस्थितीमध्ये हे लग्न करण्यात आले होते. या लग्नात ऐश्वर्याने तब्बल ७५ लाख रुपये किंमतीचा लेहंगा परिधान केला होता आणि तिच्या मंगळसूत्राची किंमत तेव्हा ४५ लाख रुपये एवढी होती. 3 सोलिटेयर डायमंड जोडलेला हे मंगळसूत्र होते.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.