पीव्ही सिंधू उर्फ फुलराणी या नावाला ओळख देण्याची गरज नाही. परंतु तिच्या मागे एक डोकेदुखी सध्या लागली आहे. तामिळनाडू मधील ७० वर्षीय आजोबाने जिल्हा कचेरीट धाव घेतली आहे कशासाठी तर पीव्ही सिंधूने त्याच्या सोबत लग्न करावे.
तामिळनाडू येथील रामंथपूरम जिल्ह्यातील मलाईसेमी यांनी कलेक्टर कडे अर्ज दाखल केलेला आहे कि, २४ वर्षीय पी व्ही सिंधूने त्याच्या सोबत लग्न केले पाहिजे. आणि या लग्नाची व्यवस्था सर्व शासकीय लोकांनी करावी अशी त्याची मागणी आहे.
हा प्रसंग जनता दरबार मध्ये घडलेला आहे. जिल्हाधिकारी यांनी जनता दरबार सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी भरविला होता तिथे हा महाभाग पोहचला आणि याने सुध्दा आपली समस्या जिल्हाधिकारी यांच्या कडे दिलेली आहे.
वय फक्त १६ वर्ष
जिल्हाधिकारी यांच्या कडे मलाईसेमी हे एक पत्र आणि फोटो घेऊन पोहचले आणि त्यांनी या अर्जामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे कि त्यांचे लग्न हे पीव्ही सिंधू यांच्या सोबत लावून देण्यात यावे. सदर पत्रात मलईसेमी याने आपले वय फक्त १६ वर्ष एवढे सांगितले आहे. आपला जन्म ४ एप्रिल २००४ ला झाला असे त्याने सांगितले आहे.
जर त्याच्या मर्जीने हे लग्न झाले नाहीतर पी व्ही सिंधूला उचलून नेईल असे त्याने या पत्रात सांगितले आहे. त्याचे म्हणणे आहे कि पी व्ही सिंधू च्या करीयर मुळे तो प्रभावित झाला आहे आणि या कारणामुळे त्याला पीव्ही सिंधू सोबत लग्न करायचे आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.