ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना, समोसा विकण्यासाठी कोणी तरुण गुगल ची नोकरी सोडू शकतो, पण हे खरच घडलं आहे. हो हे खरं आहे की मूनाफ कपाडिया नावाच्या या तरुणाने गुगलची भक्कम पगाराची नोकरी सोडली आहे. लन ही गोष्ट इथेच नाही संपत, या तरुणाने समोसे विकत आपल्या कंपनीचा टर्नओवर पोहचवला आहे 50 लाखावर.
मुनाफ ने समोसे विकण्यासाठी गुगलची चांगली नौकरी सोडली आहे. लोकं अशा व्यक्तींना मूर्ख म्हणू शकतात, पण मुनाफने लोकांचे मत एक वर्षामधेच बदलायला भाग पाडले आहे, कारण त्यांच्या कंपनीचा टर्नओवर पोहचला आहे 50 लाखावर.
गुगलमध्ये काही वर्ष नोकरी केल्यानंतर मुनाफ यांना वाटले की ते यापेक्षा काही तरी चांगलं करू शकतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन ते घरी पोहचले आणि स्वतःचा समोस्याचा व्यवसाय सुरू केला.
आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचं गुगलमध्ये काम करण्याचे स्वप्न असते. गुगल मध्ये नोकरी म्हणजे संपूर्ण आयुष्य अगदी आरामात जगणे. गुगल मध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या पगाराची आपण कल्पनाही करू शकणार नाही. कारण ही कंपनी फ्रेशर्सना कोट्यवधी पॅकेज ऑफर करते. पण हा असा व्यक्ती आहे ज्याने समोसे विकण्यासाठी गुगलची नोकरी सोडली आहे. आपण बोलत आहोत ‘द बोहरी किचन’ चे मुनाफ कपाडिया यांच्याबद्दल.
मुनाफ कपाडिया यांच्या फेसबुकच्या बायो मध्ये लिहिलेलं आहे की, ” मी तो व्यक्ती आहे ज्याने समोसे विकण्यासाठी गुगलची नोकरी सोडली आहे”. परंतु त्यांच्या समोस्याची खासियत म्हणजे तो मुंबईतील पंचतारांकित हॉटेल आणि बॉलीवूड मध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मुनाफ यांचं एमबीए चं शिक्षण झालेलं आहे. त्यांनतर त्यांनी काही कंपन्यांमध्ये नोकरी केली व ते परदेशात गेले. परदेशात पण काही कंपन्यामध्ये इंटरव्ह्यू दिल्यानंतर मुनाफ यांची निवड गुगल मध्ये झाली. काही वर्षे गुगलमध्ये नोकरी केल्यानंतर मुनाफला वाटलं की आपण यापेक्षा काही तरी खास करू शकतो, डोक्यात बिझनेसची कल्पना घेऊन ते घरी परतले व त्यांनी आपला बिझनेस सुरू केला.
मुनाफचे घर ज्या परीसरात आहे तिथे जास्तीत जास्त मध्यमवर्गीय कुटुंब राहतात. ज्या लेवल ची आयडिया मुनाफ यांच्या डोक्यात होती त्यानुसार त्यांना तिथे ग्राहक मिळणे थोडे कठीणच काम होते. त्यामुळे मुनाफ यांनी प्रयोग म्हणून आपल्या 50 मित्रांना मेल व मेसेज करुन खाण्यासाठी बोलावलं.
मुनाफ आता भारतात ‘द बोहरी किचन’ नावाचे रेस्टॉरंट चालवतात. मुनाफ सांगतात की त्यांची आई नफिसा यांना टीव्ही बघण्याचा खूप नाद आहे आणि त्यांचा जास्तीत जास्त वेळ टीव्ही बघण्यात जातो. त्यांना फूड शो बघणे खुप आवडत असे व त्यामुळे त्या जेवणही खूप छान बनवायच्या. मुनाफला वाटले की ते आपले आईकडून टिप्स घेऊन फूड चेन चालू करू शकतात. त्यांनी रेस्टॉरंट बनवायचा प्लॅन बनवला आणि अनेकांना आपल्या आईच्या हातचे जेवण खाऊ घातले. सर्वांनी त्यांच्या जेवणाची खूप स्तुती केली. यामुळे मुनाफ यांना आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ मिळाले आणि त्यांनी या कामाला सुरवात केली.
मुनाफ यांच्या हॉटेलमध्ये फक्त समोसेच मिळत नाहीत. हो पण समोसा त्यांचा ट्रेडमार्क आहे. खरं तर मुनाफ हे दाऊदी बोहरा समुदायातून आहेत, ज्यांचे जेवण खूप छान चविष्ट असते. जसे की मटन समोसा, नर्गिस कबाब, डब्बा गोस्त, कढि चावल इत्यादी. मुनाफ या डिशेस आपल्या हॉटेलमध्ये ठेवतात. बोहरी थाल मटन समोसा, नर्गिस कबाब, डब्बा गोस्त, कढि चावल साठी खुओ प्रसिद्ध आहे. ते किमा समोसा आणि रान ही बनवतात, ज्याला की प्रचंड मागणी असते. आता त्यांचं हॉटेल सुरू करून फक्त एकच वर्ष झाला आहे आणि त्यांचा टर्नओवर पोहचला आहे 50 लाखावर. मुनाफ पुढील काही वर्षात 3 ते 5 कोटिपर्यंत पोहचू इच्छितात.
मुनाफ यांची कहाणी आणि काम एवढे प्रसिद्ध झाले की फॉर्ब्सच्या 30 वर्षाखालील आचिवर्स च्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आले आहे. मुनाफ आपल्या कंपनीचे सीईओ आहेत, पण इथे सीईओ म्हणजे चीफ इटिंग ऑफिसर. मुनाफ यांच्या या हॉटेलमध्ये एव्हडी गर्दी असते की लोकांना जेवण्यासाठी अक्षरशः वाट पहावी लागते.
मुनाफ आता मुंबईच्या वरळी भागातून फूड डिलिव्हरी करतात. परंतु पुढील काळात ते याच नावाने अजून काही हॉटेल चालू करू इच्छितात. आपल्या पूर्ण यशाचे श्रेय ते आपल्या आईला देतात. कारण त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हते.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: 3 कोटीच्या घरात राहणारी उर्वशी लावते रोडच्या कडेला हाथगाडा…