फडणवीसांना गेम आणि महाविकासाआघाडीचे सरकार येण्यामागे “या” व्यक्तीने बजावली पडद्याआडची भूमिका

२३ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होऊन देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या अंधारात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते या नात्याने आपल्या आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे देऊन भाजपला आपला पाठींबा दर्शवला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला . परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खेळीनंतर तीनच दिवसात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन फडणवीसांचा गेम त्यांच्यावरच उलटवला होता. पत्रकार कमलेश सुतार यांच्या “३६ डेज अ पॉलिटिकल क्रॉनिकल ऑफ ऍम्बिशन, डिसेप्शन, ट्रस्ट ऍन्ड बिट्रेयल” या पुस्तकात याबाबत उल्लेख आता आहे.

अजित पवार आपला गेम करतील हे फडणवीसांना कधी समजले ?

दरवर्षीप्रमाणे २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना राज्य सरकारतर्फे श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संकेतानुसार मारिन ड्राइव्ह येथील पोलीस जिमखान्यात राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस दलातील अधिकारी यांच्या उपस्थितीत हा श्रद्धांजली कार्यक्रम पार पडणार होता. कार्यक्रमासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस अधिकारी उपस्थित झाले, परंतु अद्याप उपमुख्यमंत्री अजित पवार आले नव्हते. वेळ वाढत चाललं होता, तसे फडणवीसांच्या चेहऱ्यावर तणाव वाढत चालला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांच्या मनधरणीच्या प्रयत्नांना गती आली होती. दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टात फडणवीस सरकारचे भवितव्य ठरणार होते. वेळेचे पक्के असणारे अजितदादा अद्याप आले नाहीत तेव्हाच फडणवीसांना समजले की आता आपला खेळ संपला आहे. काही वेळातच अजित पवारांच्या राजीनाम्याचे वृत्त आले आणि फडणवीसांनीही राजीनामा देऊन आपले नाक वाचवले

महाविकासआघाडी सरकार स्थापन होण्यात या व्यक्तीने बजावली पडद्याआडची भूमिका

अजित पवारांना पुन्हा राष्ट्रवादीत आणल्याशिवाय आपली सत्ता येणार नाही हे राष्ट्रवादीतील सर्वांनाच कळून चुकले होते. त्यामुळे त्यांच्याकडून अजितदादांना पार्ट आणण्याचे प्रयत्न सुरु होते. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी अजितदादा घरातून बाहेर पडले आणि थेट नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडंटला आले. हॉटेलमध्ये एक व्यक्ती अजितदादांची वाट पाहत होती. त्या व्यक्तीला अजितदादा कधीच नकार देऊ शकत नव्हते.

हॉटेलात प्रवेश केल्यानंतर ती व्यक्ती अजितदादांच्या समोर आली. अजितदादांनी त्यांना नमस्कार घातला. दोघांमध्ये बोलणं झालं. तिथून अजितदादा बाहेर पडले आणि त्यांनी आपला राजीनामा दिला. कोण होती ती व्यक्ती ? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मते ती व्यक्ती दुसरीतिसरी कुणी नसून सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे हे आहे.

आपल्याला हि माहिति आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.