बिग बॉस १३ सुरु झाले आहे आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढत चालली आहे. परंतु प्रेक्षकांना नेहमी प्रश्न पडतो कि बिग बॉस आहे तरी कोण कारण बिग बॉसचा फक्त आवाज ऐकू येतो तो दिसत नाही. अनेक जण वेगवेगळे अंदाज बांधतात परंतु आम्ही तुम्हाला सांगणार आहो कि खरा बिग बॉस कोण आहे.
हा शो मागील १३ वर्षापासून चालू आहे, एक घर आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले स्पर्धक या मध्ये राहतात. जो शेवट पर्यंत टिकतो आणि प्रेक्षकांच्या मताच्या आधारे बिग बॉसचा विजेता ठरविला जातो.
बिग बॉसच्या घरातील सदस्य, त्यांचा स्वभाव आणि विविध परिस्थितींशी सामना करण्याची त्यांची ताकद अशा अनेक घडामोडी पाहणे रसिकांना आवडते. या कार्यक्रमातील सगळ्याच सिझनचे स्पर्धक, सूत्रसंचालक सलमान खान यांना प्रेक्षकांचे नेहमीच प्रेम मिळाले आहे.
‘बिग बॉस चाहते हैं’ हा भारदस्त आवाज ऐकला कि चांगले चांगले स्पर्धक थंड होतात आणि त्याचा आदेश मानतात. बिग बॉस या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनपासूनच प्रेक्षक या आवाजाच्या प्रेमात पडले आहेत.
या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनपासूनच अतुल कुमार यांचा आवाज या कार्यक्रमाला लाभलेला आहे. त्यांच्या या आवाजामुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. अतुल कुमार हे अनेक वर्षांपासून डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करतात. ते 2002 ला या क्षेत्रात आले. या क्षेत्रात प्रस्थापित व्हायच्याआधी त्यांनी काही छोट्या-मोठ्या नोकऱ्या देखील केल्या आहेत.
हे काम देखील मोठ्या जिकरीचे आहे कारण यांना २४ तास सेट वर हजर राहावे लागते कारण कोणाला कधी कुठला आदेश द्याचे काम पडेल हे सांगता येत नाही. अतुल कुमार हे मुळचे लखनो येथील आहे. शो मधील अनेक जुने स्पर्धक अतुल ला भेटलेले आहे. अतुल आणि सलमानचा वाढदिवस एकाच दिवशी येतो हे देखील विशेष आहे.
‘आयरन मैन’, ‘एवेंजर’, ‘कैप्टन अमेरिका’ सारख्या मोठ मोठ्या हॉलीवूड चित्रपटात अतुलचा हिंदी साठी आवाज वापरण्यात आलेला आहे. डबिंग आर्तीस्ट म्हणून अतुलचे नाव या क्षेत्रात मोठे आहे. २००७ मध्ये आलेली विवेगम या तमिळ चित्रपटास हिंदीसाठी अतुलचा आवाज वापरण्यात आला होता.
सोनी टिव्हीने त्यांना 2003 मध्ये पहिला मोठा ब्रेक दिला. मोना सिंगची जस्सी जैसी कोई नही ही मालिका प्रचंड गाजली होती. याच मालिकेच्या काही प्रोमोमध्ये अतुलचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला होता. त्यांनी आजवर अनेक पाश्चिमात्य देशातील मालिका, चित्रपटांना हिंदी भाषेत डब केले आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.