९० च्या दशकात असे फार कमी मराठी लोक असतील ज्यांनी माहेरची साडी हा चित्रपट बघितला नाही. जुने व्हिडीओ कैसेट असो कि गावाकडे लग्नाच्या शेवटी माहेरच्या साडीतले गाणे लावले जाते. अनेकांनी आपल्या अश्रूचा बांध या चित्रपटात मोकळा केला होता. असा हा जबरदस्त चाललेला सिनेमा होता.
दिग्दर्शक विजय कोंडके यांनी मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘माहेरची साडी’ या सिनेमाच्या रिलीजला आज २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक स्त्रिया आपल्या आयुष्या सोबत माहेरची साडी या चित्रपटाची तुलना करून बघता. सुनेला होणारा त्रास आणि सून त्यावेळी मराठीत बऱयाच काळानंतर एखाद्या चित्रपटाने एवढे घसघशीत यश मिळविले होते. मुख्य म्हणजे या चित्रपटामुळे अलका कुबल हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत जाऊन पोहोचले.
पण या चित्रपटासाठी अलका कुबल नव्हे तर हिंदीतील प्रसिद्ध भाग्यश्रीला दिग्दर्शकांची पहिली पसंती होती, हे तुम्हाला ठाऊक आहे का? नसेल कारण असे होते कि भाग्यश्रीचा नुकताच मैने प्यार किया चित्रपट आला होता आणि विजय कोंडके यांना ती या रोलसाठी परफेक्ट वाटत होती परंतु भाग्यश्रीने त्यांना दीड वर्ष होकार दिला नाही म्हणून अलका कुबल यांची निवड झाली.
अलका कुबल यांचे लेक चालली सासरला, सोबती, वहिनीची माया, तुझ्या वाचून करमेना असे अनेक कौटुंबिक सिनेमे जोरदार चालले होते. भाग्यश्रीचा होकार मिळत नसल्याने अखेर विजय कोंडके यांनी अलका कुबल यांना चित्रपटात घेतले. त्यानंतर घडलेला इतिहास सर्वश्रुत आहे. या चित्रपटानंतर अलका कुबल मराठी चित्रपटसृष्टीची आघाडीची अभिनेत्री बनल्या. आजही अलका यांना ‘माहेरची साडी’ या चित्रपटासाठीच ओळखले जाते.
मुळात हा सिनेमा मराठी मध्ये पहिल्यांदा आला नसून गुजराती चित्रपट आहे. ‘मैयरनी चुंदडी’ हा गुजराती चित्रपट खूप हिट झाला होता. त्याचे हक्क विकत घेऊन विजय कोंडके यांनी ‘माहेरची साडी’ बनवला. पुढे हा चित्रपट अनेक भाषेत बनला हिंदी मध्ये देखील जुही चावला आणि ऋषी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘साजन का घर’ (1994) या नावाने प्रदर्शित झाला होता.
ग्रामीण भागातून तर हा चित्रपट बघण्यासाठी ट्रक-ट्रक भरुन प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये यायचे. हा चित्रपट मुंबई-पुण्यातच मर्यादित न राहता महाराष्ट्रातील कानाकोप-यात प्रदर्शित करण्यात आला होता. असे म्हटले जाते, की या चित्रपटाने तब्बल त्याकाळात 12 कोटींचा व्यवसाय केला होता.
चित्रपटातील ‘नेसली माहेरची साडी’ हे गाणे त्याकाळात प्रत्येक लग्नसोहळ्यात आवर्जुन वाजविले जाई. तसेच ‘माझं छकुल छकुल’ या गाण्याने प्रत्येक बारसे पार पडत असे. ही गीते जगदिश खेबुडकर यांनी लिहिली होती, तर अनिल मोहिले यांचे त्यांना संगीत होते.