नखं ही तशी माणसाच्या आयुष्यातील निरुपयोगी गोष्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पण हौसेला कुठलं आलंय मोल ? लोकांना हौस आहे म्हणून तर लोकांच्या नखांच्या भरवशावर नेलकटरचा व्यवसाय उभा राहिला. एवढंच नाही तर नखे रंगवण्यासहीचा नेलपॉलिश व्यवसाय उभा राहिला.
ज्याची त्याची आवड आणि छंद वेगवेगळे ! या आवडीनिवडी आणि छंदामुळे माणसांना कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींतून मोठी ओळख मिळते. असेच झाले आहे पुण्यातील श्रीधर चिल्लाल यांच्याबद्दल ! ज्यांना आपण निरुपयोगी समजतो त्याच नखांनी या माणसाला जगप्रसिद्ध बनवले आहे.
जगातील सर्वात लांब नखे असणारी व्यक्ती श्रीधर चिल्लाल
“पुणे तिथे काय उणे” असे म्हटले जाते ते काय वावगे नाही. पुण्यातील श्रीधर चिल्लाल यांचीजगामध्ये सर्वात लांब नखे असणारी व्यक्ती म्हणून “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस” मध्ये नोंद झाली आहे. १९५२ पासून त्यांनी नखे कापली नव्हती, शेवटी २०१८ मध्ये त्यांनी ६६ वर्षांनंतर वयाच्या ८२ व्या वर्षी आपली नखे कापली.
गिनीज बुकात नोंद झाल्यानंतर शेवटी गतवर्षी श्रीधर चिल्लाल यांनी नखे कापण्याचा निर्णय घेतला. पण या नखे कापण्याचा चक्क इव्हेंट घेण्यात आला. न्यूयॉर्कच्या “Ripley’s Believe It or Not !” म्युझियममध्ये आयोजित समारंभात श्रीधर यांची नखे कापण्यात आली. नखे कापण्यासाठी लोखंड कापण्यासाठी वापरण्यात येणारी वापरली. श्रीधर यांची कापलेली नखे त्या म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहेत.
किती लांब होती श्रीधर यांची नखे ?
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अनुसार जेव्हा श्रीधर यांच्या डाव्या हाताच्या बोटांच्या नखांची लांबी मोजण्यात आली तेव्हा ती ९०९.६ सेमी म्हणजेच जवळपास ३० फूट होती. त्यापैकी त्यांच्या अंगठ्याचे नख सर्वात लांब १९७.८ सेमी म्हणजे जवळपास साडेसहा फूट होती.
१९५२ मध्ये शाळेत खेळत असताना चुकून श्रीधर यांच्याकडून शिक्षकांना धक्का लागला आणि त्या शिक्षकांचे लांब नख तुटले गेले होते. त्या तुटलेल्या नखावरून शिक्षकाने श्रीधर यांना खूप खडे बोल सुनावले. तेव्हाच श्रीधर यांनी याला आव्हान समजून स्वतःचीच नखे वाढवण्याचा निर्णय घेतला. परंतु या नखांमुळे त्यांच्या डाव्या हाताच्या बोटांची हालचाल करता येत नाही.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.