दरवर्षी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट तयार केले जातात, जे पाहायला प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये असेही काही चित्रपट येऊन गेले, ज्यांचा कालावधी खूप मोठा होता. परंतु हे चित्रपट मोठे असूनही ते बघत असताना प्रेक्षकांच्या मनामध्ये कधीही वेळ वाया गेल्याची भावना निर्माण झाली नाही. उलट या चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आणि हे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगलेच गाजले. पाहूया बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठे चित्रपट…
१) गँग्स ऑफ वासेपुर : मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पंकज शर्मा यांच्या भूमिकेने साकारलेला अनुराग कश्यप यांचा हा चित्रपट ५ तास १९ मिनिटांचा होता, पण तो दोन भागात प्रदर्शित करण्यात आला. २) LOC कारगिल : अभिषेक बच्चन आणि ईशा देओल यांचा अभिनय असणाऱ्या या चित्रपटाचा कालावधी ४ तास १५ मिनिटांचा होता. ३) मेरा नाम जोकर : राज कपूर यांचा हा चित्रपट ४ तास ४ मिनिटांचा होता.
४) संगम : राजेंद्र कुमार यांचा हा एक सुपरहिट चित्रपट होता, जो ३ तास ५८ मिनिटांचा होता. ५) लगान : आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा कालावधी ३ तास ४४ मिनिटे होता. ६) मोहब्बतें : शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यासारख्या मोठ्या कलाकारांची भूमिका असणाऱ्या ३ तास आणि ३६ मिनिटांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचेही खूप प्रेम मिळाले.
७) कभी अलविदा ना कहना : करण जोहरचा हा चित्रपट चांगलाच गाजला, हा चित्रपट ३ तास ३५ मिनिटांचा होता. ८) सलाम – ए – इश्क : प्रियंका चोप्रा आणि सलमान खानचा हा चित्रपट ३ तास ३५ मिनिटांचा होता.