बदलत्या जीवनशैलीत आजकाल अनेक गोष्टी आपण विसरून जातो. जुन्या काळात लोकांनां प्रत्येक गोष्टीचे चांगले उपयोग माहिती असायचे. आपल्या दररोजच्या आहारात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण वापरतो आणि फेकून देतो. पण त्याचे सर्व गुणधर्म आपल्याला माहिती नसतात. असंच काहीसं लिंबाच्या बाबतीत देखील आहे.
आपण रोजच्या आहारात लिंबू खातो पण आपण ते पूर्णपणे वापरत नाही. आपण फक्त लिंबाचा रस पिळून घेतो. कारण आपल्याला लिंबाच्या सालीचे फायदेच माहिती नाहीत. खासरेवर लिंबाच्या सालीचे असे काही फायदे बघूया जे बघून तुम्ही कधीच लिंबाची साल फेकणार नाहीत.
लिंबूच्या सालीमध्ये कॅल्शीयम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर यांचे उच्च गुणधर्म असतात. लिंबाचा औषधी म्हणून वापर करण्यासाठी लिंबाची केवळ पिवळी सालच काढा. आतला गर काढणार आहे. या सालीचा लेप तयार करा. हा लेप शरीरावर ज्या ठिकाणी वेदना होत असतात त्या ठिकाणी हा लेप लावा. लेप लावल्यानंतर त्या ठिकाणी एका कापडाने हलकं बांधा. लेप हलणार नाही किंवा खाली पडणार नाही याची काळजी घ्या.
हा लेप बनवण्यासाठी लिंबाच्या साली काढा. या साली एका काचेच्या भांड्यात काढून घ्या. यामध्ये ३-४ चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळून काचेचे भांडे बंद करा. या साली १५ दिवस मुरू द्या त्यानंतर त्या तुम्ही वापरू शकता. १५ दिवस या साली तेलात मुरल्यावर त्या तेलाने अवयवांना मालीश करा. काही काळ हे तेल शरीरावर तसेच ठेवा. थोड्या वेळाने पाण्याने अवयव स्वच्छ धुवून काढा.
लिंबाच्या सालीत व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअम अधिक प्रमाणात असते ज्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी फायद्याचे ठरते. आपल्याकडे लिंबूचे लोणचेही बनवले जाते. लिंबूच्या साली आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिसवर गुणकारी असतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.