राणु मोंडल कोण आहे हे सांगण्याची आता गरज नाही. रेल्वे स्थानकात गाणी म्हणून कसेबसे पैसे कमवायची आणि स्वतःचे पोट भरायची. कुणीतरी तिच्या गाण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो इंटरनेटवर शेअर केला.. व्हिडिओ व्हायरल झाला. लोकांना राणुचा आवाज आवडला.
त्यानंतर तिला मुंबईहून फोन आला. राणु मोंडल रियालिटी शोमध्ये गेली. हिमेश रेशमियाने तिला त्याच्या चित्रपटात गाण्याची ऑफर दिली. दोन गाणी रेकॉर्डही झाली. हिमेशने त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले, तेही व्हायरल झाले.
एका महिन्यातच रेल्वे स्टेशनवर गाणारी राणु बॉलिवूड गायिका बनली. तेव्हापासून रोज तिच्याशी संबंधित बातम्या येऊ लागल्या. ही आहे राणु मोंडलची कहाणी ! आता ती चांगलीच प्रसिद्ध झाली आहे.
आता मुद्दयावर येऊया. पहिल्यांदा व्हायरल झालेल्या राणुच्या व्हिडिओमध्ये ती “एक प्यार का नगमा है” हे गाणे गाताना दिसली होती. हे गाणे १९७२ मध्ये आलेल्या “शोर” चित्रपटातील होते. लता मंगेशकर यांनी ते गाणे गायले होते.
लता मंगेशकर राणु मोंडलविषयी काय म्हणाल्या ?
वृत्तवाहिन्यांनी लता मंगेशकरांना राणु मोंडलविषयी विचारल्यानंतर आनंदही व्यक्त केला आणि चिंताही ! त्या म्हणाल्या “जर माझ्या नावामुळे आणि कामामुळे कुणाचे भले होत असेल तर मी स्वत:ला नशीबवान मानते. परंतु मला वाटते की कॉपी करुन यशस्वी होणे योग्य नाही. हा विश्वासार्ह मार्ग नाही. माझी, किशोरदाची, मोहम्मद रफी साहेबांची, मुकेशभैय्याची किंवा आशा भोसले यांची गाणी गाऊन तुम्ही काही काळासाठी प्रसिद्ध होऊ शकता.
पण हे यश फार काळ तुमच्याबरोबर राहणार नाही. बरीच मुले माझी गाणी खूप चांगल्या पद्धतीने गातात. पण पहिले यश मिळाल्यानंतर त्यातल्या किती मुलांना तुम्ही लक्षात ठेवता ?
मला फक्त सुनिधी चौहान आणि श्रेया घोषाल माहीत आहेत. माझा सल्ला आहे की तुम्ही वास्तवात रहा. मला फक्त एवढेच सांगायचे आहे की तुम्ही माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची गाणी म्हणावीत, पण काही काळानंतर तुम्ही तुमची स्वतःची गाणीही गेला हवीत.
आशा भोसले यांनी स्वतःची गाणी गेली नसती तर आजही ती फक्त माझीच सावली बनून राहिली असती. एखादी व्यक्ती आपले कौशल्य कशा पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.”
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.