संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. २ सप्टेंबरपासून सुरू झालेला हा गणेशोत्सव १२ सप्टेंबरला बाप्पाच्या विसर्जनानंतर संपेल. लालबागचा राजा हा जगभरातील करोडो गणेश भक्तांचं आराध्य दैवत आहे. लालबागच्या राजाचा विजय असो.. या घोषणेने सध्या लालबागच्या राजाचा परिसर फुलून गेला आहे.
यावर्षी लालबागच्या राजाच्या देखाव्यात चांद्रयान -२ आणि अंतराळवीर बघायला मिळत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला गणेशभक्तांसह सेलेब्रिटींचा देखील रिघ असते. लालबागच्या राजाविषयी माहिती जाणून घेण्याकरिता गणेशभक्तांमध्ये प्रचंड उत्सुकता असते.
यंदा लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या मागे अंतराळाचा देखावा साकारण्यात आला आहे. यात अंतराळवीर, सॅटेलाइट आणि मागे ३ डी देखावा साकारण्यात आला आहे. अत्यंत विलोभनीय असा देखावा, बाप्पाच्या भक्तांना आकर्षित करत आहे.
लालबागचा राजा नवसाला पावतो अशी किमया आहे. राजाला नवसाचा गणपती म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी सुमारे ५ किमीहून जास्त भाविकांची लांब रांग असते. लालबागच्या राजाचे विसर्जन कसे केले जाते याविषयी भक्तांना उत्सुकता असते.
Radhey Meher या यूट्यूब चॅनेलवर २०१७ चा विसर्जन सोहळ्याचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. हां व्हिडिओ आतापर्यंत २० लाखाहुन अधिक लोकांनी बघितला आहे. आज खासरेवर आपन बघुया कशाप्रकारे केले जाते लालबागच्या राजाचे विसर्जन..
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.