विकी डोनर सिनेमा अनेकांनी बघितला असेल त्यामध्ये तो पैश्याची गरज भागवायला स्पर्म डोनेट करण्यात सुरवात करतो आणि नंतर सिनेमा रंजक होतो. अशीच एक गोष्ट आज आम्ही आपल्या पुढे घेऊन आलोत हि गोष्ट भारतातील नसून आहे अमेरिकेतील अमेरिकेतील विकी डोनर म्हणजे केल गॉर्डी या सत्तावीस वर्षीय युवकाची हि गोष्ट आहे.
महिन्यात ५ महिलांना देतो स्पर्म
इंग्रजी वृत्तपत्रात आलेल्या मुलाखती मध्ये त्याने हा खुलासा केला आहे कि प्रत्येक महिन्यात तो पाच लेकराचा बाप होतो. त्यासोबत त्याने अनेक रहस्य या मुलाखतीत सांगितले आहे. तर सर्वात पहिले बघू त्याला हि आयडिया कशी आली.
वयाच्या २० व्या वर्षी केल गॉर्डी याला हि आयडिया आली. त्यामागचे महत्वाचे कारण होते कि त्याला प्रेम आणि रिलेशनशिप या गोष्टी आवडत नव्हत्या त्यामुळे त्याने हि स्पर्म डोनेट करण्याची शक्कल लढवली. लॉस एंजलीसमध्ये राहणार केल गॉर्डी हा सुरवातीलाच १८ मुलांचा बाप बनला पण त्याने त्यांची जवाबदारी स्वीकारली नाही. केन हा अनेक देशात फिरतो ज्या दाम्पत्यांना मुले होत नाही किंवा ज्या महिला सिंगल आहेत त्यांना मुल हव त्यांची तो मदत करतो.
फेसबुकचा घेतला आधार
या कामासाठी केल गॉर्डी याने सर्वप्रथम आपल्या नावाचे फेसबुक पेज सुरु केले आणि त्यावरून हे आव्हान केले. जाहिराती नंतर केलची हि आयडिया प्रसिद्ध झाली आणि त्याच्या स्पर्मची मागणी वाढू लागली. केल गॉर्डीचे वडील वकील आणि आई इंजिनीयर आहे त्यामुळे तो म्हणतो कि त्याचे जीन्स हे अप्रतिम आहे.
दर महिन्याला केल गॉर्डी याला १०० हून अधिक महिलांची मागणी येते परंतु तो महिन्याला ५ महिलांना स्पर्म देऊ शकतो. विशेष म्हणजे हे काम तो अगदी मोफत करतो . हे काम तो समाजसेवा असल्या प्रमाणे करतो.
तो हे काम सिरींजच्या माध्यमातून करतो. अनेक महिला त्याला शारीरिक संबंधाची मागणी देखील करतात त्यांची देखील तो मागणी पूर्ण करतो. केल गॉर्डी त्याला कोणी इतर देशांतून बोलावले तरी सर्व्हीस देण्याची त्याची तयारी आहे. पण त्यासाठी त्याचे विमानाचे तिकिट काढायला हवे. तसेच तो नॉर्थ कोरिया किंवा युद्धाभूमीवर जाऊन सर्व्हीस द्यायलाही तयार आहे.
अशा या भन्नाट माणसाचे हे काम असेच सुरु राहो यासाठी खासरे तर्फे शुभेच्च्छा…
Mujhe bhi spurm donate krna hai..