जगामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे लोक आवर्जून भेटी द्यायला जातात. त्यापैकी काही ठिकाणे इतकी अद्भुत आहेत की त्यांच्याबद्दल केवळ ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही. पृथ्वीतलावर असेच एक ठिकाण आहे.
जवळपास ४९ डिग्री सेल्सिअस तापमान, वाळुची वादळे, दुरदुरपर्यंत कोरडे वाळवंट आणि माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची वाणवा ! पण या सगळ्या प्रतिकूलतेवर मात करुन इथल्या माणसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या निवाऱ्याची सोय केली आहे. पाहूया जमिनीखाली राहणाऱ्या माणसांच्या गावाविषयी…
कुठे आहेत जमिनीखाली राहणारी माणसं ?
दक्षिण ऑस्ट्रेलियातील ऍडिलेड शहरापासुन जवळपास ८५० किमी अंतरावर कुबेर पेडी नावाचे गाव आहे. विशेष म्हणजे हे गाव जमीनीखालीच वसले आहे. दुधी रंगाचे मौल्यवान असे रत्न असणाऱ्या ओपलच्या खाणीमध्ये इथल्या लोकांनी आपली घरे बनवली आहेत. या गावात जगातील सर्वाधिक ओपलच्या खाणी असल्यामुळे याला “जगाची आपल राजधानी” म्हणूनही ओळखले जाते.
बाहेरून मातीने सजवल्यासारखी दिसणारी इथली घरे आतून महालासारखी सुंदर आहेत. इथे जमिनीखाली लोकांची अत्यंत सुंदर सजावटीची घरे, हॉटेल्स, क्लब, म्युझियम आणि चर्चदेखील आहेत. ओपलच्या खाणी कमी झाल्यानंतर इथे पर्यटनाचा व्यवसाय वाढीस लागला आहे.
पहिल्या महायुद्धानंतर हे गाव आले उजेडात
पहिले महायुद्ध संपल्यानंतर युद्धातून परतणाऱ्या सैनिकांना याठिकाणी मौल्यवान ओपल रत्ने सापडत असल्याचा सुगावा लागला. १९१५ मध्ये इथे खोदकाम सुरु झाले. प्रचंड उष्ण वातावरणात खोदकाम करत असताना कामगारांनी जमिनीखालीच निवाऱ्याचीही सोया केली. खोदकाम संपल्यानंतर लोकांनी इथेच आपली घरे थाटली. जमिनीवर चिमणी काढून तिथे फलक लावले जातात आणि त्यावर लिहले जाते इथे खाली घर आहे.
या घरांमध्ये उन्हाळ्यात एसीची किंवा हिवाळ्यात गरमीची आवश्यकता लागत नाही. डगऊट्स म्हणून ही घरे ओळखली जातात. “पीच ब्लॅक” नावाच्या हॉलिवूड चित्रपटाचे इथे शूटिंग झाले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास १७६२ आहे. इथल्या स्थानिक भाषेत कुबेर पेडीचा अर्थ Boys Waterhole असा आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.