जाणून घ्या असे काही कृत्य जे ठरू शकतात अट्रोसिटी गुन्हा…

अट्रोसिटी ऍक्ट हा भारताच्या संसदेने 12 सप्टेंबर 1989 मध्ये पारित केलेला कायदा आहे. या कायद्यात पुढे 2015 साली सुधारणा करण्यात आली आहे. हा कायदा अनुसूचित जाती-जमातींवर अत्याचारास प्रतिबंध करणे या उद्देशाने पारित करण्यात आला होता. अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांच्या सामाजिक आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होत असली तरी बहुतेक लोक मागासलेले व दुर्बल राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यामध्ये बरेच कृत्य हे गुन्हे ठरवले गेले आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकार व पोलिसांची आहे. त्यासाठी त्यांना विविध गोष्टी करणे अनिवार्य आहे.

अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला तर त्यात विशेष सरकारी वकील नेमणे बंधनकारक आहे. राज्य सरकारला अट्रोसिटी कायद्याअंतर्गत सामूहिक दंड आकारण्याचा अधिकार आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामिन नाकारण्याची जबाबदारी सुद्धा पोलिसांची आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तींना स्वसंरक्षणासाठी शस्त्रास्त्रांचे परवाने देने, जातीय अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्याची जबाबदारी सुद्धा राज्य सरकार आणि पोलिसांची असते. राज्यस्तरीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करणे अनिवार्य असून या समितीची वर्षातून दोनदा बैठक घेऊन जातीय अत्याचारांच्या प्रकरणाचा आढावा घेतला जाणे आवश्यक आहे.

खासरेवर आज आपण जाणून घेऊया काही कृत्य जे या कायद्यानुसार गुन्हा ठरवली गेली आहेत-

Arrest

1. अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तीला योग्य वा अयोग्य पदार्थ खाण्याची व पिण्याची सक्ती करणे, 2. जातीय भावनेतून शारीरिक इजा करणे, त्रास देणे, अपमान करणे, 3. नग्न धिंड काढणे, मानवी अप्रतिष्ठा करणे, 4. स्वतच्या मालकीच्या जमीन व पाणीवापरात अडथळा निर्माण करणे,

5. धाक दाखवून मतदान करण्यास भाग पाडणे, 6. अनुसूचित जाती व जमातींच्या व्यक्तीच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करणे, 7. लोकसेवकास खोटी माहिती पुरविणे, 8. सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे 9. प्रार्थनास्थळे, नदी, विहिरी, पाणवठे अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे.

10. प्रार्थनास्थळास अथवा घरास आग लावणे, 11. पिण्याचे पाणी दूषित किंवा घाण करणे, 12. महिलांचा विनयभंग करणे, 13. महिलांचा लैंगिक छळ करणे, 14. घर किंवा गाव सोडून जाण्यास भाग पाडणे.

15. खोटी साक्ष वा पुरावा देणे, 16. पुरावा नाहीसा करणे, 17. लोकसेवकाने कोणताही अपराध करणे, 18. जमिनीचा गैरप्रकारे उपभोग घेणे.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
आजपर्यंत ६२८ जन्मठेप व ३७ आरोपींना फाशी पर्यंत पोहचवणारे वकील उज्वल निकम…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.