मुकेश आणि नीता अंबानी यांच्या घरी त्यांची जुळी मुलं ईशा आणि आकाश यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. आकाशच्या लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच रुद्रप्रयाग येथील एका मंदिरात लग्नाच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली. सांगितले जाते की लग्नातील काही विधी इथेच पार पाडल्या जाणार आहेत.
यापूर्वीच इशा आणि आकाश यांची एंगेजमेंट झाली आहे. परंतु अचानक एक बातमी समोर येत आहे की, अंबानी परिवारातील धाकटा मुलगा अनंत अंबानी याचेही लवकरच दोनाचे चार हात होणार आहेत. त्याचे सोशल मीडियावरील काही फोटो असाच इशारा करतात.
अनंतसोबत फोटोत दिसणाऱ्या मुलीला लोकांनी .घाईघाईने अंबानी परिवारातील धाकटी सून म्हणून घोषितही करून टाकले आहे. बहुतेक लोकांना अंबानी परिवारातील थोरली सून श्लोका मेहताबद्दल माहित आहे, पण लोकांना आता त्यांच्या धाकट्या सुनेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
कोण आहे ती मुलगी ?
अनंत अंबानीसोबत फोटोत असणाऱ्या त्या मुलीचे नाव राधिका मर्चेंट आहे. एनकॉर हेल्थकेयर कंपनीचे सीईओ आणि व्हाईस चेअरमन वीरेन मर्चेंट यांची ती मुलगी आहे. १८ डिसेंबर १९९४ रोजी जन्मलेल्या राधिकाने तिचे शालेय शिक्षण मुंबईच्या केथेड्रल अँड जॉन कोनेन स्कूलमधून पूर्ण केले आहे. त्यांनतर बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कुलमधून आयबी डिप्लोमाही पूर्ण केला आहे. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतुन तिने राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे.
राधिका काय करते ?
न्यूयॉर्क विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर राधिकाने २०१७ पर्यंत इस्प्रवा या रियल इस्टेट कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले आहे. ही कंपनी ज्या लोकांना चांगले घर हवे असते त्यांच्यासाठी ड्रीम होम बनवण्याचे काम करते. याव्यतिरिक्त राधिकाला वाचन, ट्रेकिंग आणि पोहण्याची आवड आहे. शांत आणि निर्जन ठिकाणी निसर्गाच्या सहवासात ट्रेकिंग करायला तिला आवडते. आपले शिक्षण आणि नोकरीच्या दरम्यान तिने स्वतःची एक फर्मही सुरु केली आहे.
अफवा की वास्तव ?
राधिका सर्वप्रथमतेव्हा चर्चेत आली होती, जेव्हा इशा अंबानीच्या एंगेजमेंटमध्ये राधिका आणि श्लोका यांनी एकत्रित घुमर डान्स केला होता. त्यानंतर आकाश आणि श्लोका यांच्या एंगेजमेंटमध्येही शाहरुख खानने स्टेजवरून राधिकाकडे इशारा करत अनंत अंबानींची मस्करी केली होती. तिथूनच लोकांनी अंदाज लावले की अनंत आणि राधिकामध्ये नक्की काहीतरी आहे.
नुकतेच सोशल मीडियावर दोघांचा एक कपल फोटोही व्हायरल झाला ज्यावरून लोकांनी त्यांच्यात लग्न होणार असल्याची चर्चा सुरु केली. परंतु रिलायन्स मीडियाच्या प्रवक्त्यांनी ही अफवा असल्याचे सांगितले आहे. दुसऱ्या बाजूला नीता अंबानींनी एका मुलाखतीत आमच्या मुलांना त्यांचा जोडीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे सांगत उत्सुकता अजूनच वाढवली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.