कन्नड सिनेमातील अभिनेता यश हा घराघरात पोहचला आहे प्रशांत नील यांचा KGF चित्रपट तुफान गाजला कि त्याला लोकांनी अक्षरश डोक्यावर घेतले परंतु यश विषयी अनेकांना फार माहिती नाही आहे. तो सुपरस्टार फैमिली मधून आला नाही आहे. यशच्या करीयरची सुरवात छोट्या पडद्यावरून झाली आणि २००७ मध्ये त्याचा पहिला चित्रपट जंबडा हुडूंगी Jambada Hudugi हा आला.
यशचे संपूर्ण नाव नवीन कुमार गोंडा हे आहे. त्याचा जन्म अरुण कुमार यांच्या घरी झाला अरुण कुमार यशचे वडील कर्नाटक एसटी महामंडळात काम करतात. ते एक बस ड्रायव्हर आहे. यश ने आपल्या १२ वर्षाच्या फिल्म करीयर मध्ये १८ सिनेमात काम केले आहे. तब्बल ४० करोडची संपत्ती असलेल्या यश कडे बंगलोर येथे ३ करोडचा बंगला आहे.
त्याच्या कडे ऑडी क्यू सेवन , रेंज रोवर अश्या गाड्या देखील आहेत. एका सिनेमा करिता यश ४ ते ५ करोड रुपये एवढी फी घेतो. मागे एस एस राजमाऊली च्या एका मुलाखातीत त्यांनी हा खुलासा केला होता कि यश चे वडील आजही बस चालवितात. अरुण कुमार यश चे वडील सांगतात कि “माझ्या या कामामुळे मी मुलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो. त्यामुळे हे काम मी मधेच सोडणार नाही.” त्यामुळे राजमाऊली म्हणतात यशचे वडील माझ्या करिता खरे हिरो आहेत.
यश ने राधिका पंडीत हिच्या सोबत लग्न केले आहे. दोघाची भेट ‘नंदा गोकुल’ या टीव्ही सिरीयल दरम्यान झाली होती. दोघांनी लपून बंगलोर येथे लग्न केले याची कोणालाही कल्पना नव्हती. त्यानंतर त्यांनी रिसेप्शन ठेवले आणि यामध्ये संपूर्ण कर्नाटक मधील जनतेस आमंत्रण दिले होते. दोघाला एक मुलगी देखील आहे.
२०१७ मध्ये यश आणि राधिकाने मिळून यशमार्ग नावाची एक सेवाभावी संस्था सुरु केली. हि संस्था गरजू लोकांना मदत करते. कर्नाटक मधील दुष्काळ पडलेल्या कोप्पाल जिल्ह्यात त्यांनी ४ करोड रुपये खर्च करून तलाव देखील मागे बनविले होते.
प्रसिद्धीच्या शिखरावर असून पाय जमिनीवर कसे ठेवावे हे कोणी यांच्या पासून शिकावे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.