कौन बनेगा करोडपती या शोमध्ये प्रश्नांची उत्तरे देऊन ७ कोटी रुपये जिंकण्यासाठी आलेले लोक किमान लाखो रुपये तरी जिंकून जातात. पण मुंबईचा एक १५ वर्षाचा मुलगा कौन बनेगा करोडपतीच्या बनावट सापळ्यात अडकला आणि त्याने स्वतःचे लाखोंचे नुकसान करून घेतले.
१ ऑगस्ट रोजी मुंबईत राहणारा मनीष आपल्या आईसोबत नालासोपाराला गेला होता. त्यावेळी त्याला एक फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःला KBC मधील असल्याचे सांगितले आणि मनीषला तो म्हणाला की, “तुम्ही KBC च्या लकी ड्रॉमध्ये २५ लाख रुपये जिंकले आहेत. तुम्हाला प्रोसेसिंग चार्ज म्हणून २०००० रुपये बँकेत जमा करावे लागतील.”
या धक्कादायक कॉलमुळे मनीषला खूप आनंद झाला. त्याने हे आपल्या आईला सांगितले आणि २०००० रुपये लगेचच त्या खात्यात जमा केले. पैसे जमा केल्यानंतर मनीषला त्याच नंबरवरुन दुसरा कॉल आला. यावेळी मनीषला २.८ लाख रुपये अजून जमा करावे लागतील असे सांगण्यात आले.
मनीष पुन्हा आईशी बोलला. यावेळी आई पैसे देण्यास तयार नव्हती, परंतु मनीषने आईला कसे राजी केले आणि कसेबसे २.८ लाख रुपये या कॉलच्या खात्यात जमा केले.पैसे खात्यावर जमा करूनही बरेच दिवस प्रतिसाद मिळाला नाही.
शेवटी तेव्हा मनीषने त्या नंबरवर फोन केला, पण फोन लागला नाही. त्याने पैसे जमा करून एक महिना झाला होता. बक्षीसाची रक्कम न मिळाल्याने मनीष आणि त्याची आई अस्वस्थ होऊ लागले. आता त्यांना असे वाटायला लागले आहे की त्या कॉलवाल्याने आपली फसवणूक केली आहे. शेवटी मनीषने आणि त्याच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. आता पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्याकडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.