मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या करिश्मा भोसले सोबत काय घडलं?

२ वर्षांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांचे प्रकरण चांगलाच तापलं होतं. त्यावेळी न्यायालयाने बेकायदेशीर भोंगे उतरवा असा दम राज्य सरकारला भरला होता. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांनी मशिदीवर बेकायदेशीर भोंगे लावणे हा मूलभूत अधिकार होऊच शकत नाही असे ठणकावून सांगितले होते.

मशिदीवरील भोंग्यांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा विषय चर्चेत येण्याचे कारण ठरली आहे मुंबईतील एक तरुणी. मानखुर्दमधील करिश्मा भोसले नावाच्या तरुणीनं मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी करण्याची विनंती केली होती. तिने ट्विटरवर ट्विट करून बेकायदेशील भोंग्यांचा आरोग्याला आणि अभ्यासाला त्रास होत आहे असा मुद्दा मांडला होता.

करिश्मा भोसले सोबत काय घडलं?

करिश्माने भोंग्याविरुद्ध आवाज उठवल्यानंतर धमक्या दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. करिष्मा मशिदीत आवाज कमी करण्याची विनंती करण्यासाठी गेली होती. त्यानंतर तिने काय घडलं याबद्दल माहिती दिली आहे.

‘२४ जूनला दुपारी ३ वाजता मी मशीद परिसरात गेले होते. त्यांनी मला पाच वाजता येण्यास सांगितलं. मी तिथे जाऊन त्यांना भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी वाद घातला. आमचं कोणासोबत शत्रुत्व नाही. अझानलाही आमचा विरोध नाही. पण, लाऊडस्पीकरवरील अझानला विरोध आहे,’ अशा शब्दांत करिश्मानं तिची भूमिका स्पष्ट केली.

‘या भागात हिंदू मुस्लिम सोबत राहतात. पण काहीजण अझानच्या नावाखाली ध्वनी प्रदूषण करत आहेत. आम्ही इथेच राहतो आणि इथेच राहणार आहोत. आम्ही सत्यासोबत असून संविधान आमच्यासोबत आहे. जे आम्हाला मदत करू इच्छितात, त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं. अनधिकृत लाऊडस्पीकरला विरोध करावा,’ असं आवाहन तिनं केलं.

करिश्मा भोसलेनं मशिदीतील काही व्हिडीओ ट्विट केले आहेत. यामध्ये तिचा काही मुस्लिम महिलांशी वाद होत असताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओत पोलीस करिश्मा आणि मुस्लिम व्यक्तींना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. आता, याप्रकरणी राजकारण पेटलं असून पोलिसांनी मशिदीच्या समितीला समजावून सांगण्याऐवजी करिश्मालाच नोटीस बजावली आहे.

करिष्मा म्हणाली कि पोलिसांनी मला नेमकी नोटीस कशासाठी पाठवली हे अजूनही कळले नाही. विशेष म्हणजे मस्जीद समितीने अद्यापही लाऊडस्पीकरचा आवाज कमी केला नाही, असे करिश्माने म्हटलं आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.