…म्हणून लोक विचारतायत बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री करण जोहरच्या बापाची आहे का ?

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच दुसऱ्या बाजूला बॉलिवूडमधील नेपोटीजम हा चर्चेचा विषय बनला आहे. नेपोटीजम म्हणजे वशिलेबाजीने आपल्या जवळच्या नातलगांना काम मिळवून देणे. बॉलिवूडमधील या गटबाजीमुळेच सुशांत आज आपल्यात नाही असे चाहत्यांचे मत आहे.

एका बाजूला के.के.मेनन, इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, कंगना राणावत, आयुष्यमान खुराणा, मनोज वाजपेयी, पंकज त्रिवेदी, राजकुमार राव, सुशांत सिंह राजपूत यासारख्या कलाकारांनी स्वतःच्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले. तर दुसऱ्या बाजूला आलीय भट, रणबीर कपूर, सोनम कपूर, टायगर श्रॉफ, सारा अली खान, वरुन धवन, अर्जुन कपूर, इत्यादि लोक नेपोटीजम मधून बॉलिवूडमध्ये आले.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील लॉबिंग बद्दल बोललं जात आहे. कंगना राणावतने बॉलिवूडमधील चित्रपट माफियांवर जोरदार टीका केली आहे. सुशांतने इतके चांगले चित्रपट करुनही जाणीवपूर्वक त्याला एकही पुरस्कार मिळू दिला गेला नाही यावर बोट ठेवले आहे.

दिग्दर्शक शेखर कपूर यांनीही बॉलिवूडनमधील काही लोक सुशांतला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर शाहिद कपूर आणि शाहरुख खानने एका कार्यक्रमात सुशांतची खिल्ली उडवल्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. तसेच करण जोहर आणि आलीय भट्ट देखील अशाच एका शो मधील व्हिडीओमुळे ट्रॉल होत आहेत.

करण जोहर आणि त्याच्या यशराज फिल्म्स प्रोडक्शन कडून गेली २ वर्षे सुशांत सिंह राजपूतचा प्रचंड छळ केल्याचे बोलले जात आहे. सुशांतने यशराज फिल्म्सचे १-२ चित्रपट नाकारुन शेखर कपूरचा सामाजिक विषयावरील “पाणी” चित्रपट निवडल्याने सुशांतला जवळपास सर्वांनीच वाळीत टाकले होते. त्याला संजय लीला भन्साळी, बेफिकरे चित्रपटातून काढून टाकण्यात आले. त्याचे चित्रपट काढून रणबीर सिंगला देण्यात आले. त्यामुळे सुशांतचे चाहते विचारत आहेत, बॉलिवूड इंडस्ट्री करण जोहरच्या बापाची आहे का ?

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.